न्यूझीलंडचा युवा क्रिकेटपटू रचिन रविंद्र याने आयसीसी इमर्जिंग क्रिकेटर ऑफ द इयर 2023 चा पुरस्कार जिंकला आहे. रचिनने गेल्या वर्षी एकदिवसीय सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली होती आणि त्यामुळेच यशस्वी जयस्वाल आणि गेराल्ड कोएत्झी या सर्वोत्कृष्ट खेळाडूंना मागे टाकत हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जिंकण्यात तो यशस्वी ठरला. रचिनने 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडसाठी चमकदार कामगिरी केली होती.
या 24 वर्षीय अष्टपैलू खेळाडूने 2023 मध्ये केवळ 31 आंतरराष्ट्रीय डावात 911 धावा केल्या. गोलंदाजीतही उत्कृष्ट कामगिरी करत 28 डावात 23 विकेट्स घेतल्या. यादरम्यान रचिन रविंद्र (Rachin Ravindra) याने तीन शतकेही झळकावली, ती सर्व शतके आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये आली होती. याशिवाय त्याच्या बॅटमधून 3 अर्धशतकंही निघाली. गेल्या वर्षी मार्चमध्येच त्याने न्यूझीलंडकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
View this post on Instagram
मागच्या वर्षी आयसीसी वनडे विश्वचषक खेळला गेला. विश्वचषक स्पर्धेत रचिनने न्यूझीलंड संघासाठी सर्वात जास्त धावांचे योगदान दिले. त्याने विश्वचषकात 578 धावा कुटल्या, तर गोलंदाजाच्या रुपात 5 विकेट्स देखील घेतल्या. न्यूझीलंडचा विश्वचषकातील उपांत्य सामन्यापर्यंतचा प्रवास एकप्रकारे रविंद्रमुळे शक्य झाला, असे म्हणता येईल. विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात त्याने इंग्लंडविरुद्ध शतकी खेळी केली होती. या शतकानंतर रचिनला आत्मविश्वास आला आणि त्याने विश्वचषकादरम्यान एकापेक्षा एक खेळी केल्या. (Rachin Ravindra won the ICC Emerging Player of the Year 2023 Award )
महत्वाच्या बातम्या –
सानिया मिर्झाला ट्रोल करणाऱ्यांनी ओलांडल्या मर्यादा, शमीसोबतचा ‘हा’ फोटो केला जातोय व्हायरल
BREAKING: सूर्यकुमार यादवने जिंकला आयसीसी पुरुष ‘टी-20 क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्कार, दोनदा कोरलं पुरस्कारावर नाव