भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सिडनी येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात वर्णभेद संदर्भात मोठा वाद निर्माण झाला आहे. सामन्यादरम्यान काही ऑस्ट्रेलियन प्रेक्षक मोहम्मद सिराज व जसप्रीत बुमराह वर वर्णभेदात्मक अपशब्द वापरत होते . या संदर्भात मोहम्मद सिराज व कर्णधार अजिंक्य रहाणेने अंपायरशी चर्चा केल्यानंतर त्या प्रेक्षकांना मैदानाबाहेर हाकलून दिले गेले. या संतापजनक प्रकरणाबद्दल बीसीसीआयने देखील कडक शब्दात निंदा केली आहे.
बीसीसीआयने वर्णभेद संदर्भात आयसीसी व ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाला एक रिपोर्ट पाठवली आहे. या रिपोर्टमध्ये स्पष्ट खुलासा केला आहे की प्रेक्षकांनी मोहम्मद सिराजला ‘बिग मंकी’ आणि ‘ब्राउन डॉग’ या नावाने हाका मारल्या आहेत. प्रेक्षकांनी जसप्रीत बुमराह विरुद्ध देखील अपशब्द वापरले होते.
ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावातील 86 व्या षटकात मोहम्मद सिराजने कर्णधार अजिंक्य कडे आपली नाराजी व्यक्त केली. अजिंक्यने थेट अंपायर सोबत चर्चा करत संपूर्ण प्रकरण त्यांना सांगितले. यानंतर सामना बराच वेळ रोखला गेला व त्या टिप्पणी करणार्या प्रेक्षकांना मैदानाबाहेर हाकलून देण्यात आले. मात्र या प्रकरणासंदर्भात अधिक कठोरात कठोर निर्णय घेण्याची संपूर्ण क्रिकेट विश्वाकडून मागणी केली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“लक्षात असूद्या हा कसोटी सामना आहे”, टीकेचा धनी ठरलेल्या पुजाराच्या मदतीला धावून आला भारतीय क्रिकेटर
मुहुर्त लागला! तब्बल ‘इतक्या’ वर्षांनंतर भारतीय सलामीवीरांनी कसोटीत बिनबाद खेळली २० षटके
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी: कृणाल पंड्याच्या दमदार खेळीच्या जोरावर बडोद्याची विजयी सुरुवात