महिला टी२० चॅलेंजच्या तिसऱ्या सामन्यात वेलोसिटी आणि ट्रेलब्लेझर्स या दोन्ही संघात चांगली लढत पाहायला मिळाली. महिला टी२० चॅलेंजच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवण्यासाठी दोन्ही संघाना हा सामना महत्त्वाचा होता. या सामन्यात नाणेफेक जिंकून वेलोसिटीची कर्णधार दीप्ती शर्माने ट्रेलब्लेझर्सला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. त्यानंतर सबिनेनी मेघना आणि जेमिमा रॉड्रिग्जच्या अर्धशतकांमुळे स्म्रीती मंधनाच्या ट्रेलब्लेझर्स संघाने १९० धावा केल्या.
यादरम्यान डंकलीने चांगली खेळी करत संघासाठी योगदान दिले. डावाच्या शेवटच्या षटकांत राधा यादवने डंकलीचा जबरदस्त झेल घेत तिचा डाव संपवला. राधा यादवच्या या झेलचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
वेलोसिटी विरुद्ध ट्रेलब्लेझर्स या सामन्यात महिला क्रिकेटचा स्तर उंचावल्याचे दिसून आले आहे. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण अशा प्रत्येक आघाडीवर महिला क्रिकेटपटू जीवाचे रान करताना दिसल्या. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ट्रेलब्लेझर्सने महिला टी२० चॅलेंजमध्ये सर्वाधिक १९० धावा केल्या आहेत. ज्यामध्ये सॅबिनीन मेघना आणि जेमिमा रॉड्रिग्स यांनी चांगली फलंदाजी केली. शेवटी डंकली फलंदाजीसाठी आली आणि तिने तुफान फलंदाजी करण्यास सुरुवात केली. तिने अवघ्या ८ चेंडूत १९ धावा केल्या.
पण शेवटच्या षटकात राधा यादवने घेतलेल्या अप्रतिम झेलने डंकलीचा डाव संपुष्टात आला. डंकलीने शेवटच्या षटकातील पहिल्या दोन चेंडूंवर २ चौकार मारले होते. यानंतर, त्याने तिसऱ्या चेंडूवर २ धावा घेतल्या आणि चौथ्या चेंडूवर मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात लाँग ऑफच्या दिशेने एक हवाई शॉट खेळला. पण चेंडू आणि बॅटचा संपर्क चांगला नव्हता. त्यामुळे चेंडू सीमारेषेबाहेर जाऊ शकला नाही. यावेळी लाँग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षण करणाऱ्या राधा यादवने चटकन चेंडूकडे धाव घेतली आणि डायव्ह मारत झेल पूर्ण केला. सामन्यानंतर राधाने घेतलेल्या झेलची चांगलीच चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले.
https://twitter.com/MohitKu38157375/status/1529857183894368263
दरम्यान, या सामन्यात १९१ धावांचे लक्ष्य असणाऱ्या वेलोसिटी संघाने फलंदाजीला सुरुवात केली. मात्र ठराविक अंतराने विकेट्स गमावल्याने संघाला विजयी होता आले नाही. मात्र, तरीही गेल्या सामन्यात चांगला रन-रेटने विजय मिळवल्याने वेलोसिटी संघाला फारसे नुकसान झाले नाही. शिवाय सामना हरूनही आता वेलोसिटी संघाने अंतिम सामन्यात धडक मारली आहे. शनिवार दिनांक २८ मे रोजी वुमन्स टी२० चॅलेंजची अंतिम लढत वेलोसिटी विरुद्ध सुपरनोव्हाज अशी होणार आहे.
व्हॉट्सअप वर अपडेट मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा
‘…तर उमरान मलिक भारतासाठी दीर्घकाळ खेळू शकतो’, बासीसीआय अध्यक्ष गांगुलीने केले स्पष्ट
‘नशीब चांगलं नव्हतं, पण…’, लखनऊ स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर गंभीरचा चाहत्यांना खास संदेश
आयपीएल संपल्या-संपल्या भारतीय संघ जाणार श्रीलंका दौऱ्यावर; जूनमध्ये होणार ‘या’ मालिका