पुणे, 12 ऑक्टोबर 2023: आयटीएफ, एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या व आर्यन पंप्स यांनी प्रायोजित केलेल्या एमटी आयटीएफ एस 400(गुण) वरिष्ठ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत राधिका कानिटकर हिने तीनही गटात विजेतेपद पटकावत तिहेरी मुकुट संपादन केला. तर, केतन धुमाळने दुहेरी मुकुट, तर केदार शहा व अभिषेक ताम्हाणे, श्रीकांत कुमावत व विशाल साळवी यांनी विजेतेपद पटकावले.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मिश्र दुहेरी 40 वर्षांवरील गटात अंतिम फेरीत राधिका कानिटकर व आदित्य कानिटकर यांनी सोनल फडके व आकाश काळे यांचा 6-0, 6-1 असा सहज पराभव करून विजेतेपद पटकावले. 40 वर्षांवरील महिला एकेरीत राऊंड रॉबिन फेरीत पहिल्या सामन्यात राधिका कानिटकरने आरती गणेशचा, तर दुसऱ्या सामन्यात नियती जिरंगेचा 6-1, 6-0 अशा सारख्याच फरकाने पराभव करत अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपदाचा मान पटकावला.
40 वर्षांवरील पुरुष गटात एकेरीत अंतिम फेरीत अव्वल मानांकित आदित्य खन्नाने दुसऱ्या मानांकित मंदार वाकणकरचा सुपरटायब्रेकमध्ये 7-5, 6-7(4) [10-8] असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. 40 वर्षांवरील दुहेरी गटात अंतिम फेरीत केदार शहाने अभिषेक ताम्हाणेच्या साथीत संग्राम चाफेकर व आदित्य खन्ना यांचा 6-4, 6-4 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
पुरुष 30 वर्षावरील दुहेरीत अंतिम लढतीत श्रीकांत कुमावत व विशाल साळवी या जोडीने प्रसनजीत पॉल व रवींद्रनाथ पांडे यांचा 6-3, 6-4 असा पराभव करून विजेतेपद मिळवले. पुरुष 35 वर्षांवरील दुहेरीत अंतिम फेरीत केतन धुमाळ व अभिजित मुजुमदार यांनी गिरीश मिश्रा व अमित टिळक यांचा 6-4, 6-1 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
स्पर्धेतील विजेत्यांना करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर, स्पर्धा संचालक रामा राव डोसा, हिमांशु गोसावी, आयटीएफ सुपरवायझर लीना नागेशकर आदी मान्यवर उपस्थित होते. (Radhika Kanitkar wins triple crown at MT ITF S400 Senior Tennis Championships)
स्पर्धेचा सविस्तर निकाल: 40 वर्षांवरील गट: अंतिम फेरी:
आदित्य खन्ना(भारत)[1]वि.वि.मंदार वाकणकर(भारत)[2]7-5, 6-7(4) [10-8];
मिश्र दुहेरी 40 वर्षांवरील गट: अंतिम फेरी:
राधिका कानिटकर(भारत)/आदित्य कानिटकर(भारत)वि.वि.सोनल फडके(भारत)/आकाश काळे(भारत) 6-0, 6-1;
पुरुष 55 वर्षावरील एकेरी गट: उपांत्य फेरी:
भूषण अकुत( भारत)[1]वि.वि.करणजीत सिंग परमार(भारत) 6-2, 6-0;
आलोक भटनागर(भारत)[3] वि.वि जितेंद्र प्रधान(भारत)[2]6-1, 5-7, 10-3;
पुरुष 60 वर्षांवरील गट: उपांत्यपूर्व फेरी:
शरद टाक(भारत)[8]वि.वि.पवन जैन(भारत)[1] 6-1, 6-4;
लक्पा शेर्पा(भारत)[6]वि.वि.आशिष सेन(भारत)[2] 6-2, 6-4;
संजय कुमार(भारत)[4]वि.वि.मेहर प्रकाश कोडुरी(भारत)[7]6-2, 6-3;
नागराज रेवणसिद्दैया(भारत)[5]वि.वि.दिलीप सिंग नोंगमाथेम(भारत)[3] 6-1, 6-0;
पुरुष 65 वर्षांवरील गट: उपांत्य फेरी:
अजित भारद्वाज( भारत)[1]वि.वि.राजेश कुमार(भारत)[3] 6-1, 6-2;
मुथटी सुरेश(भारत)[2]वि.वि.नॉनडोव्ह पूनाचा पलांगंडा(भारत) 6-4, 2-6, 10-8;
पुरुष 70 वर्षावरील गट: उपांत्य फेरी:
जॉर्ज थॉमस पुथापारंबिल (भारत)वि.वि.रत्नाकरराव अॅने (भारत)[4] 6-3, 6-0;
अजस छटवाल(अमेरिका)[2]वि.वि.रामाराव डोसा (भारत)[3]6-1, 6-1;
पुरुष 75 वर्षांवरील एकेरी गट: उपांत्य फेरी:
नरेंद्र जनवेजा(भारत)[1]वि.वि.वेंकट कृष्ण कुमार अरिपिराला(भारत) 6-0, 6-0;
श्रीकांत पारेख (भारत)वि.वि.लक्ष्मण अंबुलकर(भारत)[2]6-2, 6-1;
महिला 40 वर्षांवरील: राऊंड रॉबिन फेरी:
राधिका कानिटकर वि.वि.आरती गणेश 6-1, 6-0
राधिका कानिटकर वि.वि.नियती जिरंगे 6-1, 6-0;
पुरुष 40 वर्षांवरील दुहेरी गट: अंतिम फेरी:
केदार शहा/अभिषेक ताम्हाणे वि.वि.संग्राम चाफेकर/आदित्य खन्ना 6-4, 6-4;
पुरुष 30 वर्षावरील दुहेरी गट: अंतिम फेरी:
श्रीकांत कुमावत/विशाल साळवी वि.वि.प्रसनजीत पॉल/रवींद्रनाथ पांडे 6-3, 6-4;
पुरुष 35 वर्षांवरील दुहेरी गट: अंतिम फेरी:
केतन धुमाळ/अभिजित मुजुमदार वि.वि.गिरीश मिश्रा/अमित टिळक 6-4, 6-1;
महिला 40 वर्षांवरील दुहेरी गट: अंतिम फेरी:
राधिका कानिटकर/राधिका मांडके पुढे चाल वि.मयुका सकाई/आरती गणेश
महत्वाच्या बातम्या –
दक्षिण आफ्रिकेने ठेचल्या ऑस्ट्रेलियाच्या नांग्या, आख्खा संघ ‘इतक्या’ धावांवर गारद, गुणतालिकेत जबरदस्त फेरबदल
पाच वेळचा जगज्जेता ऑस्ट्रेलियन संघ दक्षिण आफ्रिकेपुढे उध्वस्त! स्वस्तात विकेट्स गमावताच घडला नकोसा विक्रम