फ्रेंच ओपनमध्ये रविवारी (11 ऑक्टोबर) झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या स्पेनच्या राफेल नदालने सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचचा 6-0, 6-2, 7-5 ने पराभव केला. 34 वर्षीय नदालने 13 वे फ्रेंच ओपनचे किताब पटकावला. तसेच पुरुष एकेरीमधील हे त्याचे 20 वे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. त्यामुळे त्याने आता पुरुष एकेरीत सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररशी बरोबरी केली आहे. हा त्याचा 20 वा ग्रँड स्लॅम खिताब आहे.
सामना जिंकल्यानंतर नदाल म्हणाला की, “माझ्यासाठी हे खूप कठीण वर्ष होते, आज अंतिम सामना जिंकून आनंद झाला. आज मी रॉजर फेडररच्या विक्रमाची बरोबरी करण्याचा विचार करत नव्हतो. सामना जिंकायचाच विचार करत होतो.”
कोर्टबद्दल बोलताना तो म्हणाला की, “रोलँड गॅरोसचे हे कोर्ट माझ्या कारकिर्दीत खूप महत्वाचे आहे. माझ्या टेनिस कारकीर्दीतील सर्वात महत्त्वाचे विजय मी या कोर्टवर मिळवले. मला सहकार्य करणाऱ्या सर्वांचे खूप खूप आभार. या कोर्टवर खेळून मला अधिक प्रेरणा मिळते. माझे या शहरावरही खूप प्रेम आहे. या कोर्टवर मिळालेले विजय अविस्मरणीय आहेत.”
पुढे बोलताना तो म्हणाला की, “मला सर्वांना एक संदेश द्यायचा आहे, या महामारीच्या काळात आपण सर्वांनीच संघर्ष केला आहे. हा वाईट काळ नेहमीच आपल्या स्मरणात राहील. सतत प्रगतीच्या मार्गांवर राहा, सकारात्मक रहा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपण एकत्र मिळून लवकरच या व्हायरसवर विजय मिळवू.”
नदालचा हा फ्रेंच ओपन स्पर्धेतील १०० वा विजय देखील होता. त्याने आत्तापर्यंत या स्पर्धेत केवळ २ पराभव पत्करले आहेत. तसेच तो एका ग्रँडस्लॅम स्पर्धेत १०० किंवा त्यापेक्षा अधिक विजय मिळवणारा रॉजर फेडरर नंतरचा दुसराच टेनिसपटू आहे. फेडररने विम्बल्डनमध्ये १०० हून अधिक विजय मिळवले आहेत.
1️⃣0️⃣0️⃣ not out 👏@RafaelNadal #RolandGarros pic.twitter.com/1mN4DYoEKm
— Roland-Garros (@rolandgarros) October 11, 2020
पुरुष एकेरीत सर्वाधिक ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावणाऱ्या टेनिसपटूंची यादी खालील प्रमाणे आहे-
रॉजर फेडरर – 20
राफेल नदाल – 20
नोवाक जोकोविच – 17
पीट सॅम्प्रस – 14
रॉय इमर्सन – 12
महत्त्वाच्या बातम्या-
-एकेकाळी मॅगी खाऊन ढकलत होता दिवस; आज मनगटावर १ कोटीचं घड्याळ
-व्वा रे मुंबईकर! दिल्लीविरुद्धचा सामना रोहित शर्मासाठी ठरला खूपच ‘खास’, कसं ते पाहा
-अखेर मुंबई विरुद्ध मुंबईकर अजिंक्य रहाणेला मिळाली संधी; पाहा असा आहे ११ जणांचा दिल्ली संघ
ट्रेंडिंग लेख-
-वाढदिवस विशेष.! क्रिकेटवर मनापासून प्रेम करणारा दर्दी ‘महानायक’
-‘नरेल एक्सप्रेस’ : तब्बल १५ शस्त्रक्रिया होऊनही फलंदाजावर आग गोळे फेकणारा अवलिया गोलंदाज
-फलंदाजीत लईच भारी! ‘या’ ३ संघांचा आयपीएल २०२०मध्ये नादच खुळा