पॅरीस। स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदालने आज फ्रेंच ओपनची उपांत्य फेरी गाठली आहे. त्याने अर्जेंटिनाच्या डिएगो श्वार्टझमॅनचा उपांत्यपूर्व फेरीत तीन तास 42 मिनिटे चाललेल्या सामन्यात 4-6, 6-3, 6-2, 6-2 असा पराभव केला.
हा सामना काल सुरू झाला होता परंतू काल दोन वेळा पावसाचा व्यत्यय आल्याने अखेर हा सामना अर्ध्यातच थांबवण्यात आला होता. त्यानंतर आज उर्वरित सामना पार पडला.
11 वे मानांकन असणाऱ्या श्वार्टझमॅनने सुरवातीला पहिला सेट जिंकून सामन्यात आघाडी घेतली होती. तसेच त्याने दुसऱ्या सेटमध्येही 3-2 अशी आघाडी घेतली होती. परंतू पावसाचा व्यत्यय आला. त्यामुळे खेळ 40 मिनिटांसाठी थांबवण्यात आला.
या अडथळ्यानंतर पुन्हा खेळ सुरू झाला. पण त्यानंतर नदालने श्वार्टझमॅनला कोणतीही संधी न देता 20 मिनिटातच दुसऱ्या सेटमध्ये 5-3 अशी आघाडी घतली. परंतू पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावल्याने काल हा सामना थांबला.
आज पुन्हा पुढे सामना सुरू झाल्यानंतर अव्वल मानांकित नदालने अनुभवाच्या जोरावर सामना आपल्या नावावर केला. याआधी या दोघांमध्ये झालेल्या पाचही सामन्यात नदालने विजय मिळवला आहे.
आजच्या विजयामुळे 10 वेळच्या फ्रेंच ओपन विजेत्या नदालने 11 व्यांदा फ्रेंच ओपनची उपांत्य फेरी गाठली आहे. 4 पैकी कोणत्याही ग्रॅंडस्लॅम स्पर्धेची 11 वेळा उपांत्य फेरी गाठणारा नदाल हा केवळ तिसरा खेळाडू ठरला आहे. यापुर्वी फेडरर आणि जिमी काॅनोर्स यांनी असा पराक्रम केला आहे.
विशेष म्हणजे नदाल फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीत पोहचल्यावर कधीही पराभूत झाला नाही. त्याने यापुर्वी १० वेळा या स्पर्धेची उपांत्यफेरी गाठली असुन त्याने १० वेळा या स्पर्धेत विजेतेपद मिळवले आहे.तसेच त्याने फ्रेंच ओपनची सर्वाधिक 11 वेळा उपांत्यफेरी गाठली आहे.
नदालचा नदाल फ्रेंच ओपन 2018च्या उपांत्य फेरीतील सामना पाचव्या मानांकित जुआन डेल पोट्रोशी होणार आहे. डेल पोट्रोने आज उपांत्यपूर्व फेरीत क्रोएशियाच्या मारीन चिलीचचा 6-7(5-7),7-5,3-6,5-7 अशा फरकाने पराभव केला.
सर्वाधिक वेळा ग्रॅंडस्लॅम उपांत्य फेरीत प्रवेश करणारे खेळाडू
४३- फेडरर
३१-जोकोविच
३१- जिमी काॅनोर्स
२८- लेंडल
२७- नदाल
२६- अागासी
२३- सॅंप्रास
१९- मॅकइन्रो
१९- एडबर्ग#म #मराठी #RolandGarros #frenchOpen pic.twitter.com/Wq2jyQDLl1— Sharad Bodage (@SharadBodage) June 7, 2018
४ पैकी कोणत्याही ग्रॅंडस्लॅम स्पर्धेची ११ वेळा उपांत्य फेरी गाठणारा नदाल हा केवळ तिसरा खेळाडू ठरला आहे. यापुर्वी फेडरर आणि जिमी काॅनोर्स यांनी असा पराक्रम केला आहे. #म #मराठी #RolandGarros #frenchOpen pic.twitter.com/uFPyxTLbFV
— Sharad Bodage (@SharadBodage) June 7, 2018
राफेल नदाल @rolandgarros च्या उपांत्य फेरीत पोहचल्यावर कधीही पराभूत झाला नाही. त्याने यापुर्वी १० वेळा या स्पर्धेची उपांत्यफेरी गाठली असुन त्याने १० वेळा या स्पर्धेत विजेतेपद मिळवले आहे. #म #मराठी #RolandGarros #frenchOpen pic.twitter.com/22BojRtKEa
— Sharad Bodage (@SharadBodage) June 7, 2018








