---Advertisement---

‘इंग्लंड संघाला सराव देताय का?’ सतत फ्लॉप ठरत असलेल्या रहाणे, पुजाराला नेटकऱ्यांनी केले ट्रोल

Ajinkya Rahane and Cheteshwar Pujara
---Advertisement---

भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा यांनी भारतीय संघाला अनेकदा संकटातून बाहेर काढले आहे. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून हे दोघेही फलंदाज साजेशी कामगिरी करण्यात अपयश ठरले आहे. इंग्लंड संघाविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात देखील अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा हे फ्लॉप ठरले आहेत. ज्यामुळे सोशल मीडियावर चाहत्यांनी या दोघांना ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

लॉर्ड्सच्या मैदानावर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या दोन्ही फलंदाजांकडून मोठी खेळी खेळण्याची अपेक्षा होती. परंतु, जेम्स अँडरसनने अजिंक्य रहाणेला १ तर चेतेश्वर पुजाराला अवघ्या ९ धावांवर माघारी धाडले होते. ही निराशाजनक कामगिरी पाहून चाहते संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.

एका युजरने ट्विट करत लिहिले की, “असे वाटत आहे की,अजिंक्य रहाणे आणि पुजाराला भारतीय संघात, इंग्लिश खेळाडूंचा सराव करून देण्यासाठी संधी दिली आहे. ही वेळ युवा खेळाडूंना संधी देण्याची आहे.”

तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की,”रहाणे आता संघावर एक ओझे आहे.” तसेच आणखी एका युजरने खेळाडूंना दोष न देता, प्रशिक्षक बदलण्याची मागणी केली आहे. त्याने लिहिले की, “फॉर्ममध्ये नसल्यामुळे खेळाडूंना दोष देऊ नका. त्यांचा थकवा ही पाहा. त्यांना कोण थकवत आहे? द्रविडला आणण्याची वेळ आली आहे. रवी शास्त्री दादांची भूमिका पार पाडण्यात व्यस्त आहेत.”

https://twitter.com/ELEGANCE____45/status/1426126632209707009

https://twitter.com/cric_virat/status/1426128143442530309

ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर दोघेही ठरले फ्लॉप!
अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराने ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध २०२०-२१ मध्ये झालेल्या कसोटी मालिकेत चांगली कामगिरी केली होती. पुजाराने या दौऱ्यावर उत्कृष्ट फलंदाजी करून भारतीय संघाच्या विजयात मोलाची भुमिका बजावली होती. तसेच अजिंक्य रहाणेने मेलबर्न कसोटी सामन्यात शतकी खेळी केली होती. परंतु, या दौऱ्यानंतर दोन्ही खेळाडूंना साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडल्यानंतर ब्रॉडचे तुटले हृदय, केली भावनिक पोस्ट शेअर

मार्क वूडच्या वेगवान चेंडूने रिषभ पंतला दाखवला पव्हेलियनचा रस्ता, पाहा व्हिडिओ

भारताचे ५ डावखुरे महान फलंदाज, ज्यांनी रचला आहे वनडे क्रिकेटमध्ये इतिहास

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---