कालपासून(30 ऑगस्ट) वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात दुसरा कसोटी सामना सबिना पार्क, किंग्स्टन येथे सुरु झाला आहे. या सामन्यातून वेस्ट इंडीजचा अष्टपैलू क्रिकेटपटू राहकिम कॉर्नवॉलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.
त्याची मागील अनेक दिवसापासून क्रिकेट जगतात चर्चा सुरु होती. ही चर्चा त्याच्या वजनामुळे होत होती. कॉर्नवॉलचे वजन 140 किलोग्रॅम असून त्याची 6 फूट 5 इंच उंची आहे. तसेच त्याने या सामन्यात पदार्पणाबरोबरच कसोटीतील सर्वात वजनदार क्रिकेटपटू ठरण्याचा इतिहासही रचला आहे.
या सामन्यात कॉर्नवॉलने भारताचा भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजाराची विकेट घेतली आणि 2 झेल घेऊन पदार्पणाच्या सामन्यातील पहिला दिवस गाजवला. त्याने पुजाराला 6 धावांवर बाद केले. ही त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिली विकेट ठरली. तसेच त्याने केएल राहुल आणि मयंक अगरवाल यांचे झेलही घेतले.
या पहिल्या दिवसाच्या कामगिरीनंतर कॉर्नवॉल म्हणाला, ‘पदार्पण केल्यानंतर चांगले वाटत आहे. मला वाटते सुरुवातीला चेंडू चांगला येत होता. मला अजून काम करावे लागणार आहे आणि चेंडूला योग्य जागेत टाकावे लागणार आहे.’
‘आमच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली होती आणि जेव्हा माझ्याकडे गोलंदाजीसाठी चेंडू सोपवण्यात आला, तेव्हा मीही तेच केले. पहिली कसोटी विकेट मिळाल्यानंतर छान वाटले.’
‘आम्हाला वाटले खेळपट्टीवर ओलावा आहे. त्यामुळे आम्ही विचार केला की प्रथम गोलंदाजी करण्याची आम्हाला संधी मिळाली तर आम्हाला लवकर विकेट्सही घेता येतील. नाणेफेकही आम्ही जिंकली. कसोटी क्रिकेटमधील हा पहिला दिवस चांगला होता.’
या सामन्यात भारताने पहिल्या दिवसाखेर पहिल्या डावात 5 बाद 2264 धावा केल्या आहेत. भारताकडून कर्णधार विराट कोहलीने 76 आणि सलामीवीर फलंदाज मयंक अगरवानेही 55 धावांची अर्धशतकी खेळी केली आहे. तसेच वेस्ट इंडीजकडून पहिल्या दिवसाखेर कर्णधार जेसन होल्डरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या आहेत.
रहकीम काॅर्नवाॅल या १४०किलोग्रॅम वजनाच्या क्रिकेटरने काल विंडीजकडून कसोटी पदार्पण केले. कसोटी क्रिकेट इतिहासातील तो सर्वात वजनदार क्रिकेटर ठरला आहे.यापुर्वी आॅस्ट्रेलियाच्या वार्विक आर्मस्ट्राॅग(१३३-१३९) यांच्या नावावर हा विक्रम होता. #RahkeemCornwall #WIvIND #INDvsWI #म #मराठी pic.twitter.com/R89U9CDclS
— Sharad Bodage (@SharadBodage) August 31, 2019
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–कर्णधार कोहलीने शानदार अर्धशतक करत क्लाइव्ह लॉइड, ब्रायन लाराला टाकले मागे
–विंडीज विरुद्ध कसोटीत संधी न मिळालेल्या शिखर धवनचा झाला या भारतीय संघात समावेश
–याच दिवशी ८ वर्षांपुर्वी द्रविडने घेतला होता क्रिकेटमधील सर्वात मोठा निर्णय