ढाका। रविवारी(१४ फेब्रुवारी) वेस्ट इंडिज संघाने बांगलादेशला कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात १७ धावांनी पराभूत केले. याबरोबरच वेस्ट इंडिजने २ सामन्यांची कसोटी मालिका २-० अशा फरकाने जिंकली. या वेस्ट इंडिजच्या विजयात त्यांचा फिरकीपटू राहकिम कॉर्नवॉलने मोलाचा वाटा उचलला.
वजनामुळे आला होता प्रकाशझोतात
राहकिम कॉर्नवॉलने जेव्हा २०१९ साली भारताविरुद्ध आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते, तेव्हा तो पहिल्यांदा त्याच्या उंची आणि वजनामुळे प्रकाशझोतात आला होता. त्याची साडेसहा फुट उंची असून जवळपास १४० किलो वजन आहे.
पुढे कॉर्नवॉलने त्याची ओळख केवळ त्याचे वजनामुळेच राहणार नाही याची काळजी घेत कसोटी क्रिकेट गाजवण्यास सुरुवात केली. त्याने आत्तापर्यंत ५ कसोटी सामने खेळले असून त्यात २७ विकेट्सही घेतल्या आहेत. तसेच दोनवेळा डावात ५ विकेट्स घेण्याची कामगिरीही त्याने केली आहे.
विशेष म्हणजे नुकत्याच संपलेल्या बांगलादेशविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत त्याने १४ विकेट्स घेतल्या.
बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत चमकला कॉर्नवॉल
कॉर्नवॉलने बांगलादेशविरुद्ध पहिल्या डावात ७४ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. त्यामुळे वेस्ट इंडिजला बांगलादेशला पहिल्या डावात २९६ धावांवर रोखण्यात यश आहे. तत्पूर्वी वेस्ट इंडिजने पहिल्या डावात ४०९ धावा केल्या होत्या. त्यामुळे त्यांना ११३ धावांची आघाडी घेतली.
त्यानंतर वेस्ट इंडिजचा दुसरा डाव ११७ धावांवर संपुष्टात आला. पण पहिल्या डावातील ११३ धावांच्या आघाडीमुळे वेस्ट इंडिजने बांगलादेशला २३१ धावांचे आव्हान दिले.
या आव्हानाचा पाठलाग बांगलादेश करत असताना पहिल्या षटकात कॉर्नवॉलने गोलंदाजीसाठी चेंडू हातात घेतला तो सामन्याच्या शेवटपर्यंत. म्हणजेच एका बाजूने वेस्ट इंडिजचे अन्य गोलंदाज आलटून पालटून गोलंदाजी करत असताना कॉर्नवॉलने सलग ३० षटके गोलंदाजी केली. त्याने तब्बल सलग ३० षटकांचा स्पेल पूर्ण केला. यावेळी त्याने त्याच्या ३० षटकात १०५ धावा देत ४ विकेट्स घेतल्या.
🔹 5/74 in the first innings
🔹 4/105 in the second inningsRahkeem Cornwall has been named the Player of the Match 👏#BANvWI pic.twitter.com/SKSxJhoDPk
— ICC (@ICC) February 14, 2021
विशेष म्हणजे त्याच्या वैयक्तिक ३० व्या आणि डावाच्या ६० व्या षटकात बांगलादेशकडून मेहदी हसनने एक चौकार आणि एक षटकारासह ११ धावा काढत सामना बांगलादेशकडे झुकवण्याचा प्रयत्न केला होता. पण ६१ व्या षटकात कॉर्नवॉलच वेस्ट इंडिजच्या मदतीला धावून आला. बांगलादेशच्या आधीच ९ विकेट्स गेलेल्या असताना त्याने वॉरिकनच्या गोलंदाजीवर मेहदी हसनचा स्लीपमध्ये शानदार क्षेत्ररक्षणाचे प्रदर्शन करत झेल घेतला. कॉर्नवॉलने हा झेल घेतला आणि वेस्ट इंडिजने हा सामनाही जिंकला.
या सामन्याचा सामनावीर पुरस्कारही कॉर्नवॉलला देण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या –
हरभजनबद्दची आठवण सांगताना आर अश्विन म्हणाला, ‘माफ कर भज्जू पा, पण मी आनंदी आहे’
भारतीय क्रिकेटर्स सामन्यादरम्यान वापरत आहेत जीपीएस ट्रॅकर, ‘हे’ आहे कारण
आयपीएल लिलाव २०२१ : सचिनच्या अर्जुनवर हे तीन संघ लावणार बोली