क्रिकेटच्या इतिहासात अनेक असे रेकाॅर्डस आहेत की, क्षेत्ररक्षणामुळे अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात संघांनी विजय मिळवला आहे. क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षणासाठी फिटनेस खूप महत्त्वाचा असतो. खेळाडू तंदुरुस्त नसल्यास, चपळाईने क्षेत्ररक्षणात 100 टक्के देऊ शकणार नाही. तत्पूर्वी 140 किलो वजनाचा खेळाडू मैदानात डाईव्ह मारून चेंडू थांबवत आहे. हा पराक्रम वेस्ट इंडिजच्या रहकीम कॉर्नवॉलने (Rahkeem Cornwall) केला आहे.
वेस्ट इंडिजचा स्टार अष्टपैलू खेळाडू रहकीम कॉर्नवॉल (Rahkeem Cornwall) सध्या कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये (CPL) खेळत आहे. तो या स्पर्धेत बार्बाडोस रॉयल्सचा (Barbados Royals) भाग आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रहकीम सध्या सक्रिय क्रिकेटपटूंमध्ये सर्वात वजनदार खेळाडू आहे. रिपोर्ट्सनुसार, त्याचे वजन सुमारे 140 किलो आहे.
कॅरेबियन प्रीमियर लीगमधील 13वा सामना बार्बाडोस रॉयल्स आणि बारबुडा फाल्कन्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यादरम्यान रहकीम कॉर्नवॉलने जबरदस्त क्षेत्ररक्षण केले. त्याच्या शानदार क्षेत्ररक्षणाचा व्हिडिओ बार्बाडोस रॉयल्सने सोशल मीडियावर शेअर केला आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये फलंदाज हलक्या हाताने फाइन लेगच्या दिशेने शॉट्स खेळतो, चेंडू कॉर्नवॉलच्या दिशेने येत असल्याचे पाहून तो धावतो आणि मग तो चेंडू रोखण्यासाठी उत्कृष्ट डाईव्ह मारतो आणि चेंडू रोखण्यात यशस्वी ठरतो.
100% effort. 200% commitment. Rahkeem Cornwall. 🫡💗 pic.twitter.com/1ZQouwqHTh
— Barbados Royals (@BarbadosRoyals) September 12, 2024
महत्त्वाच्या बातम्या-
भारत-पाकिस्तान सामन्यात मोठा राडा! मैदानावरच भिडले दोन्ही संघांचे खेळाडू
भारताचा स्टार खेळाडू होणार निवृत्त? व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केलेल्या ‘या’ गोलंदाजापुढे स्टार फलंदाज गार