अफगाणिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज रहमानउल्ला गुरबाज याने भारतीय संघाचा युवा खेळाडू रिंकू सिंग याच्याबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने रिंकू सिंगवर पूर्ण विश्वास व्यक्त केला असून एमएस धोनी आणि युवराज सिंग यांनी निर्माण केलेली फिनिशिंगची परंपरा रिंकू सिंग पुढे नेणार असल्याचे सांगितले. रहमानउल्ला गुरबाज याच्या मते रिंकू सिंग खूप मेहनत घेतो आणि म्हणूनच तो आज इतका यशस्वी क्रिकेटर आहे.
रिंकू सिंग (Rinku Singh) आणि रहमानउल्ला गुरबाज (Rahmanullah Gurbaz) दोघेही आयपीएलमध्ये एकत्र खेळतात. दोन्ही खेळाडू कोलकाता नाईट रायडर्स संघाचा भाग आहेत. याच कारणामुळे गुरबाजने रिंकू सिंगला खूप जवळून पाहिले आहे आणि त्याला त्याच्याबद्दल खूप काही माहिती आहे. अलीकडेच अफगाणिस्तानविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यात रिंकू सिंगने चांगली खेळी केली. (rahmanullah gurbaz confident of rinku singh carrying forward dhoni yuvraj legacy)
माध्यमांशी बोलताना रहमानउल्ला गुरबाजला विचारण्यात आले की, रिंकू सिंग एमएस धोनी (Ms Dhoni) आणि युवराज सिंग (Yuvraj Singh) यांचा वारसा पुढे नेऊ शकतो का? याला उत्तर देताना गुरबाज म्हणाला, “हे काम तो नक्कीच करू शकतो. सध्या तो ज्या प्रकारे कामगिरी करतोय ते खूपच अविश्वसनीय आहे. भारतीय संघासाठी त्याची अलीकडची कामगिरी पाहिली तर त्याने प्रत्येक चांगल्या संघाविरुद्ध जबरदस्त कामगिरी केली आहे. संघात येण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी नाही तर दीर्घकाळ खेळण्यासाठी येथे आलो आहे, हे त्याने सिद्ध केले आहे. तो नेहमीच कठोर परिश्रम करतो आणि ही त्याच्यासाठी चांगली गोष्ट आहे. तो परिस्थितीशी फार लवकर जुळवून घेतो. तो भारताचा पुढचा सर्वोत्कृष्ट फिनिशर असू शकतो आणि त्याच्या संघासाठी तो एक उत्कृष्ट क्रिकेटर असल्याचे सिद्ध होईल.”
रिंकू सिंग भारतीय संघामध्ये फिनिशर म्हणून चांगली भूमिका बजावत आहे आणि आतापर्यंत त्याने अनेक शानदार खेळीही खेळल्या आहेत. (Rinku will carry forward the legacy of MS Dhoni and Yuvraj Singh Afghanistan batsman predicts)
हेही वाचा
मोठी बातमी; भारताचा जावई दुसऱ्यांदा चढला बोहल्यावर, प्रसिद्ध अभिनेत्रीशी थाटला संसार, पाहा फोटो
‘रिंकू सिंग हा डावखुरा एमएस धोनी आहे’, पाहा आर अश्विनने का केलाय एवढा मोठा दावा