आजपासून(5 सप्टेंबर) बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान संघात एकमेव कसोटी सामना चितगाव येथे सुरु झाला आहे. या सामन्यात अफगाणिस्तानकडून पहिल्या डावात रेहमत शहाने शतकी खेळी केली आहे. याबरोबर कसोटीमध्ये अफगाणिस्तानकडून खास इतिहासही रचला आहे.
रेहमकतने या सामन्यात 187 चेंडूत 102 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 10 चौकार आणि 2 षटकार मारले. या शतकामुळे तो कसोटी क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानकडून शतक करणारा इतिहासातील पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे.
अफगाणिस्तानचा हा कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील तिसराच सामना आहे. याआधी खेळलेल्या दोन्ही कसोटी सामन्यात त्यांच्याकडून एकाही क्रिकेटपटूला शतकी खेळी करता आली नव्हती. पण आज रेहमत शहाने शतकी खेळी करत अफगाणिस्तानच्या खात्यात पहिले कसोटी शतक जमा केले आहे.
आजपासून सुरु झालेल्या बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान संघातील कसोटी सामन्यात अफगाणिस्तानने पहिल्या दिवसाखेर 96 षटकात 5 बाद 271 धावा केल्या आहेत.
त्यांच्याकडून रेहमत शहाच्या शतकी खेळी बरोबरच असगर अफगाणने नाबाद 88 धावांची अर्धशतकी खेळी केली आहे. पहिल्या दिवसाखेर अफगाणबरोबर अफसर झझाई 35 धावांवर नाबाद खेळत आहे. तसेच पहिल्या दिवशी बांगलादेशकडून तैजूल इस्लाम आणि नईम हसनने प्रत्येकी 2 विकेट्स तर महमुद्दलाहने 1 विकेट घेतली आहे.
या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
First Test centurions for –
🇦🇺 ➔ Charles Bannerman
🇧🇩 ➔ Aminul Islam
🏴 ➔ WG Grace
🇮🇳 ➔ Lala Amarnath
🍀 ➔ Kevin O'Brien
🇳🇿 ➔ Stewie Dempster
🇵🇰 ➔ Nazar Mohammad
🇿🇦 ➔ Jimmy Sinclair
🇱🇰 ➔ Sidath Wettimuny
🌴 ➔ Clifford Roach
🇿🇼 ➔ Dave Houghton🇦🇫 ➔ RAHMAT SHAH 👏👏 pic.twitter.com/aeeA9L9M13
— ICC (@ICC) September 5, 2019
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–जेव्हा स्टिव्ह स्मिथ क्रिकेटच्या चेंडूवरच नाही तर बीच बॉलवरही मारतो चौकार, पहा व्हिडिओ
–चक्क स्टंप्सवर बेल्स नसतानाही सुरु राहिला चौथा ऍशेस कसोटी सामना!
–संजय बांगर अडकले संकटात, जर ‘असे’ झाले तर बीसीसीआय करणार चौकशी