fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

जेव्हा स्टिव्ह स्मिथ क्रिकेटच्या चेंडूवरच नाही तर बीच बॉलवरही मारतो चौकार, पहा व्हिडिओ

कालपासून(4 सप्टेंबर) सुरु झालेल्या इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील चौथ्या ऍशेस कसोटी सामन्यात काल पहिल्या दिवशी पाऊस आणि जोरदार वाऱ्याचा सातत्याने व्यत्यय येत होता. जोरदार वाऱ्याच्या व्यतयामुळे काल या सामन्यात एक अनोखी गोष्टही चाहत्यांना पहायला मिळाली.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील 29 व्या षटकादरम्यान एक बीच बॉल जोरदार वाऱ्यामुळे मैदानात उडून आला. तो बॉल फलंदाजी करत असलेला ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टिव्ह स्मिथच्या जवळ आला. त्यामुळे स्मिथनेही तो बीच बॉल बॅटने टोलावला.

तो बॉल स्मिथने टोलावल्यानंतर सरळ बाऊंड्री लाईनला लागून थांबला. ह्या गमतीशीर घटनेची मैदानावरील उपस्थित चाहत्यांनीही टाळ्या वाजवत मजा घेतली. या घटनेचे फोटो आयसीसीनेही सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

विशेष म्हणजे काल जोरदार वाऱ्याच्या व्यत्ययामुळे बेल्सही स्टंप्सवर टिकत नव्हत्या. काहीवेळासाठी हा सामना विना बेल्सचा सुरु होता.

स्मिथने या सामन्यात पहिल्या दिवशी 81 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आहे. तसेच त्याने मार्नस लॅब्यूशानेबरोबर तिसऱ्या विकेटसाठी 116 धावांची भागीदारीही केली. लॅब्यूशाने 67 धावा करुन बाद झाला.

या सामन्यात  पाऊस आणि जोरदार वाऱ्याच्या व्यत्ययांनंतर पहिल्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 44 षटकात 3 बाद 170 धावा केल्या आहेत. पहिल्या दिवसाखेर स्मिथ 60 धावांवर आणि ट्रेविस हेड 18 धावांवर नाबाद खेळत आहेत.

इंग्लंडकडून पहिल्या दिवशी स्टुअर्ट ब्रॉडने 2 विकेट्स तर क्रेग ओव्हरटॉनने 1 विकेट घेतली आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

चक्क स्टंप्सवर बेल्स नसतानाही सुरु राहिला चौथा ऍशेस कसोटी सामना!

संजय बांगर अडकले संकटात, जर ‘असे’ झाले तर बीसीसीआय करणार चौकशी

१५ वर्षांपूर्वीचा विश्वविक्रम मोडत राशिद खानने कसोटी क्रिकेटमध्ये रचला नवा इतिहास

You might also like