कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर श्रीलंका विरुद्ध भारत संघात तीन टी२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना बुधवारी (२८ जुलै) खेळला गेला. श्रीलंकेने हा सामना आपल्या नावे करत मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. या सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला असला तरी, भारतीय खेळाडूंनी जबरदस्त क्षेत्ररक्षण केले. संघाचा युवा लेगस्पिनर राहुल चाहरने एक अफलातून झेल घेत सर्वांची मने जिंकली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
राहुलचा अफलातून झेल
संघातील प्रमुख खेळाडू क्वारंटाईन असल्याने भारतीय संघाला या सामन्यात केवळ पाच फलंदाजांनिशी उतरावे लागले. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत भारताला १३२ धावांवर रोखले. धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेने सावध सुरुवात करत २.३ षटकात १२ धावा बनवल्या होत्या.
तिसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूवर श्रीलंकेचा सलामीवीर अविष्का फर्नांडो याने भुवनेश्वर कुमारचा चेंडू फाईन लेगच्या दिशेने फ्लिक केला. हा चेंडू सहज षटकार जाईल असे वाटत असताना, राहुल चाहरने मीड विकेटच्या जागेवरून तो झेल टिपला. झेल टिपला तरी, आपण सीमारेषेबाहेर जाऊ असा अंदाज आल्याने त्याने चेंडू पुन्हा हवेत उडवला आणि सीमारेषेबाहेरून पुन्हा मैदानात येत झेल पूर्ण केला.
Rahul Chahar's presence of mind gets India a wicket off Bhuvi's bowling ☝🏽
Avishka Fernando has to depart for 11Tune into Sony Six (ENG), Sony Ten 1 (ENG), Sony Ten 3 (HIN), Sony Ten 4 (TAM, TEL) & SonyLIV now! 📺#SLvINDOnlyOnSonyTen #HungerToWin #AvishkaFernando pic.twitter.com/gtel3scK5X
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) July 28, 2021
श्रीलंकेचा रोमांचक विजय
पहिल्या सामन्यात नामुष्कीजनक पराभव स्वीकारल्यानंतर श्रीलंका संघाने दुसऱ्या सामन्यात पुनरागमन करत मालिका बरोबरीत आणली. भारतीय संघ या सामन्यात आपल्या पूर्ण क्षमतेने खेळू शकला नाही. कारण, संघातील ९ खेळाडूंना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना कर्णधार शिखर धवनच्या ४० व पदार्पण करणाऱ्या देवदत्त पडिक्कलच्या २९ धावांच्या जोरावर निर्धारित २० षटकात १३२ धावा केल्या. प्रत्युत्तरात, भारतीय क्रिकेटपटूंनी अप्रतिम गोलंदाजी करत श्रीलंकेचा डाव कोसळवला. मात्र, अनुभवी धनंजय डी सिल्वाने अखेरपर्यंत नाबाद राहत चमिका करूणारत्नेच्या साथीने संघाला दोन चेंडू राखून विजय मिळवून दिला. नाबाद ४० धावांची खेळी करणाऱ्या डी सिल्वाला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या-
पहिल्याच सामन्यात पडिक्कलच्या नावे जमा झाला कधीही न मोडणारा विक्रम, वाचा सविस्तर
श्रेयस अय्यरने सुरु केली आयपीएलची तयारी, ‘या’ दिग्गजांकडून घेतोय प्रशिक्षण