मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेल्या चुरशीच्या सामन्यात मुंबई संघाने बाजी मारत ७ गडी राखून विजय मिळवला. या विजयासह मुंबई संघाने ६ गुणांसह गुणतालिकेत चौथे स्थान पटकावले आहे. या सामन्यात मुंबई संघासाठी उल्लेखनीय गोलंदाजी करणाऱ्या राहुल चाहरच्या होणाऱ्या पत्नीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या सामन्यात मुंबई संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच राजस्थान संघाकडून सलामीला फलंदाजी करण्यासाठी यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर यांची जोडी मैदानात आली होती. या दोघांनीही संघाला तुफान सुरुवात करून दिली होती. बटलरने राजस्थान संघासाठी ४१ धावांची खेळी केली होती. तर दुसरीकडे जयस्वाल देखील मोठ मोठे षटकार मारत होता.
त्यावेळी कर्णधार रोहित शर्माने आपला फिरकी गोलंदाज चाहरला गोलंदाजी करण्यासाठी बोलवले. संपूर्ण स्पर्धेत आपल्या गोलंदाजीने सर्वांचेच लक्ष वेधून घेणाऱ्या चाहरने या सामन्यातदेखील उल्लेखनीय कामगिरी केली. आधी त्याने बटलरला माघारी धाडले. त्यानंतर त्याने टाकलेल्या दहाव्या षटकातील पाचव्या चेंडूवर जयस्वालने मिड विकेटच्या दिशेने शॉट खेळत १ धाव घेण्याचा प्रयत्न केला होता.
परंतु बॅटचा कडा घेत तो चेंडू चाहरच्या हातात गेला आणि जयस्वाल झेलबाद झाला होता. आपल्या पत्नीपुढे भन्नाट विकेट घेतल्याने चाहरला आनंदाश्रू अनावर झाले आणि डोळे पुसत आनंद साजरा करु लागला. हे पाहून त्याची होणारी पत्नी ईशानीही भलतीच खुश झाली होती. चाहरने जयस्वालला बाद केल्यानंतर तिला प्रचंड आनंद झाला होता. तिने टाळ्या वाजवत त्याचे कौतुक केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Chahar spells ????????????????????????-????????????????????????????! ????
Sends back Jaiswal for 32! ????#OneFamily #MumbaiIndians #MI #MIvRR #IPL2021 @rdchahar1 pic.twitter.com/64s45PAJcb
— Mumbai Indians (@mipaltan) April 29, 2021
https://twitter.com/lodulalit001/status/1387723423036547076?s=20
काही दिवसांपूर्वी चाहरने ईशानीचा एक फोटो शेअर करत लिहिले होते की, “भेटा माझ्या हेअर स्टाईलिशला.” याद्वारे त्याने ईशानी ही त्याची होणारी पत्नी असल्याचे जगजाहीर केले होते.
राजस्थान रॉयल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्स संघासमोर १७२ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना क्विंटन डी कॉकने नाबाद ७० धावांची खेळी केली होती. तर कृणाल पंड्याने ३९ धावांची खेळी केली होती. हा सामना मुंबई इंडियन्स संघाने ७ गडी राखून आपल्या नावावर केला.
महत्त्वाच्या बातम्या-
गरमागरमी! चालू सामन्यात कार्तिक धवनशी भिडला, मग गब्बरनेही ‘असे’ दिले प्रत्युत्तर; व्हिडिओ व्हायरल
पहिल्याच षटकात ६ चौकार मारणाऱ्या पृथ्वी शॉचे सामन्यानंतर शिवम मावीने धरले मानगूट, पाहा व्हिडिओ






