प्रो कबड्डी सीजन ७ मध्ये काल (२ सप्टेंबर) तामिळ थालवाज विरुद्ध तेलुगू टायटन्स यांच्यात सामना झाला. तेलुगू टायटन्सने ३५-३० असा विजय मिळवला. पण या सामन्यात तमिळ थलायवाजला पराभव स्विकारावा लागला असला तरी त्यांचा स्टार रेडर राहुल चौधरीने प्रो कबड्डीत महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे.
तेलुगू टायटन्स विरुद्ध खेळताना काल राहुलने ४ पॉइंट मिळवले. त्यामुळे तो प्रो कबड्डीत ९०० रेडींग पॉइंट्सचा टप्पा पार करणारा दुसराच खेळाडु ठरला आहे. त्याला या सामन्याआधी हा टप्पा पार करण्यासाठी ३ पॉइंट्सची आवश्यकता होती.
राहुलच्या आधी ९०० रेडींग पॉइंट्सचा टप्पा पटना पायरेट्सचा कर्णधार परदीप नरवालने केली आहे.
राहुल चौधरीने प्रो कबड्डीत आतापर्यंत ११३ सामन्यांत ९०१ रेडींग पॉइंट्ससह एकूण ९५८ पॉइंट्स मिळवले आहेत. तसेच ३८ सुपर टेन आणि २४ सुपर रेड केल्या आहेत. तर परदीप नरवाल ९६२ रेडींग पॉइंट्स मिळवत पहिल्या क्रमांकावर आहे.
प्रो कबड्डीत सर्वाधिक रेडींग पॉइंट्स मिळवणारे खेळाडू:-
परदीप नरवाल- ९६२ रेड गुण (९६ सामने)
राहुल चौधरी- ९०१ रेड गुण (११३ सामने)
अजय ठाकूर- ७९० रेड गुण (११४ सामने)
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–काय सांगता !! प्रो कबड्डीत पहिल्यांदाच एकाच संघात ५ शतकवीर
–स्मिथ पुन्हा एकदा नंबर-१; कोहलीची कसोटी क्रमवारीत घसरण