---Advertisement---

रोहितच्या जागी टीम इंडियात निवड झालेल्या प्रियांक पांचलला द्रविडने दिलेला ‘हा’ मोलाचा सल्ला

On: बुधवार, डिसेंबर 15, 2021 10:18 AM
Priyank Panchal and Rahul Dravid
---Advertisement---

येत्या २६ डिसेंबरपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिकेला प्रारंभ होणार आहे. ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाचा १८ सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे. ज्यामध्ये न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या मालिकेत विश्रांती घेतलेल्या खेळाडूंचे पुनरागमन झाले होते, तर रोहित शर्माला कसोटी संघाचे उपकर्णधारपद देण्यात आले होते. परंतु, सराव करत असताना तो दुखापतग्रस्त झाला आहे. ज्यामुळे तो या मालिकेतून बाहेर झाला आहे. त्याच्याऐवजी प्रियांक पांचालला संधी देण्यात आली आहे. दरम्यान, प्रियांक पांचालने आता राहुल द्रविडबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. (Rahul Dravid advice to priyank Panchal)

प्रियांक पांचालने सांगितले की जेव्हा त्याला भारत अ संघाचा कर्णधार करण्यात आले होते, तेव्हा तो खूप उत्साही होता. त्यावेळी त्याला भारत अ संघाचा तेव्हा प्रशिक्षक असलेल्या राहुल द्रविडने मोलाचा सल्ला दिला होता.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, प्रियांक पांचालने म्हटले की, “सराव सत्र सुरू असताना मी खूप उत्साही झालो होतो. मी विचार करत होतो की आता मी कर्णधार आहे, मग मला हे करावं लागेल, मला ते करावं लागेल. उत्साहात, नेहमी आपण विसरतो की नक्की काय करायचं आहे. म्हणूनच राहुल द्रविड सरांनी मला शांत आणि साधं राहण्यास सांगितले होते. “

तसेच तो पुढे म्हणाला की, “तुम्ही आपोआप उत्साही होता. त्यावेळी तुम्हाला तुमच्या खेळात बदल करण्याची आवश्यकता नसते. जितके वर्ष तुम्ही देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळता अगदी तसंच खेळायच असतं. राहुल द्रविडच्या या सल्ल्यामुळे मला खूप मदत झाली.”

https://twitter.com/BCCI/status/1470387302480302083

प्रियांक पांचालची कारकीर्द
प्रियांक पांचालने आतापर्यंत १०० प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ४५.५२ च्या सरासरीने ७०११ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने २४ शतक देखील झळकावले आहेत. तसेच ७५ अ दर्जाच्या सामन्यात त्याने ७५ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने २५८४ धावा केल्या आहेत, तर ५० टी२० सामन्यात त्याच्या नावे १३२७ धावांची नोंद आहे. त्याला रोहित शर्माच्या जागी स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

सूर्यकुमारने आरसीबीविरुद्ध ‘मै हू ना’ सेलिब्रेशन? एक वर्षानंतर कारण उघड

आऊट ऑफ फॉर्म’ रहाणेने शोधला नवा गुरू, दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी लयीत परतण्यासाठी घेतले कानमंत्र

प्रियांक पांचाळकडे स्वतःला सिद्ध करण्याची उत्तम संधी” रोहित संघाबाहेर झाल्यानंतर चाहत्यांच्या प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---