---Advertisement---

द्रविडला निर्धाव षटक टाकत अख्तरने दाखवला ‘माज’, मग फलंदाजाने डोळे वटारत बसवली दातखिळी

On: गुरूवार, नोव्हेंबर 25, 2021 12:08 AM
---Advertisement---

वर्ष २००५-०६ दरम्यान भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानचा शेवटचा दौरा केला होता आणि त्या दौऱ्यावर खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला ०-१ ने पराभव पत्करावा लागला होता. अर्थात या मालिकेत भारतीय संघाचा पराभव झाला होता, पण या मालिकेत आपल्याला अनेक विक्रमही पाहायला मिळाले आणि त्यापैकी एक म्हणजे भारताकडून सलामी देताना ४१० धावांची भागीदारी, जी केली होती वीरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविडची जोडीने.

लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या कसोटी सामन्यात राहुल द्रविडने शतक झळकावले. तर वीरेंद्र सेहवागने द्विशतक केले होते. मात्र, हा सामना आणखी एका कारणासाठीही लक्षात राहिला आणि ते म्हणजे शोएब अख्तर आणि राहुल द्रविड यांच्यातील जंग.

होय, पाकिस्तानने पहिल्या डावात ६७९/७ धावा केल्या आणि पहिल्या विकेटसाठी ४१० धावांची भागीदारी केल्यानंतर भारतीय सलामीवीरांनीही चांगली सुरुवात केली. यादरम्यान भारताचा डाव वेगाने पुढे जात असताना शोएब अख्तर आपल्या डोळ्यांद्वारे राहुल द्रविडवर राग काढताना दिसला, मात्र याचदरम्यान राहुलनेही अख्तरला जशात तसे प्रत्युत्तर दिले होते. यावेळचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.

https://twitter.com/Aag_Lage_Tumhe/status/1463108351231873029?s=20

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, जेव्हा भारताची धावसंख्या बिनबाद १७९ धावांवर होती, तेव्हा शोएब अख्तरने राहुल द्रविडला मेडन ओव्हर टाकले होते. हे षटक संपल्यावर अख्तर राहुलकडे जातो आणि त्याच्याकडे डोळे वटारुन बघू लागतो. यावर द्रविड शांत राहात अख्तरकडे डोळे मोठे करुन पाहात त्याच्याच भाषेत उत्तर देताना दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

कशी असेल द्रविड-विराटची जोडी? भारतीय दिग्गजाने दिले उत्तर

‘कृपया मंकडींग शब्द वापरणे बंद करा’; विनू मंकड यांच्या मुलाची बीसीसीआयला विनंती

टिम पेनच्या लाजिरवाण्या कृत्यावर डेविड वॉर्नरच्या पत्नीने दिली प्रतिक्रिया; म्हणाली, ‘मला काळजी…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---