श्रीलंका आणि भारत यांच्यातील तीन वनडे सामन्यांची मालिका शुक्रवारी (२३ जुलै) पूर्ण झाली. भारताने या मालिकेत २-१ असा विजय संपादन केला. पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवल्यानंतर अखेरच्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. भारतीय संघाने केलेले सहा बदल या पराभवास कारणीभूत असल्याचे म्हटले जाते आहे. मात्र, या सामन्यात सातत्याने अपयशी ठरत असलेल्या मनीष पांडेला वारंवार संधी दिल्याने, तो प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा आवडता खेळाडू असल्याचे म्हटले जात आहे.
अपेक्षेनुसार कामगिरी करू शकला पांडे
जवळपास सात वर्षांपासून भारतीय संघासाठी खेळत असलेला मधल्या फळीतील फलंदाज मनिष पांडे याला श्रीलंका दौऱ्यावर निवडण्यात आले होते. वनडे मालिकेतील पहिल्याच सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली. या सामन्यात तो चांगला जम बसल्यानंतर ४० चेंडूत २६ धावा काढून खराब फटका खेळत बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यातही त्याला ३१ चेंडूमध्ये ३७ धावा काढून खेळत असताना दुर्दैवीरित्या धावबाद झाल्याने त्याला तंबूत परतावे लागले होते.
तिसऱ्या सामन्यातही मिळाली संधी
मालिका विजयानंतर भारतीय संघातील सामन्यासाठी पाच बदल करण्यात आले होते. चांगल्या फॉर्ममध्ये असणाऱ्या इशान किशनला या सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. तिसऱ्या सामन्यात मनीष पांडे पुन्हा एकदा अपयशी ठरला आणि केवळ ११ धावा काढून माघारी परतला. त्यामुळे, भारताचा प्रभारी प्रशिक्षक राहुल द्रविड हा मनीष पांडेला खराब कामगिरीनंतरही वारंवार संधी देत असल्याचे म्हटले जात आहे.
अशी राहिली आहे कारकीर्द
भारतीय संघासाठी २०१५ मध्ये पदार्पण करणाऱ्या मनीषने आत्तापर्यंत केवळ २८ वनडे व ३९ टी२० सामने खेळले आहेत. यामध्ये तो अनुक्रमे ५५५ आणि ७०९ धावा काढण्यात यशस्वी ठरला. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात युएई व ओमान येथे होणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड होण्याची त्याची अखेरची संधी श्रीलंकेविरुद्धची टी२० मालिका असू शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
इंग्लंडहून आलं बोलावणं, सूर्यकुमारसह ‘हे’ २ धुरंधर कसोटीत इंग्लंडशी करणार दोन हात!
व्यस्त वेळापत्रकातही शॉने प्रेयसीसाठी काढला वेळ, मध्यरात्री ‘या’ अंदाजात केले बड्डे विशेष,
अरेरे… ‘कोहली’ अतिशय दुर्देवीपणे धावबाद; गल्ली क्रिकेटमध्येही असा रनआऊट पाहिला नसेल!