---Advertisement---

द्रविडच्या ‘या’ मास्टरस्ट्रोकमुळे भारतीय संघाने मिळवला विजय, भुवनेश्वर कुमारने केला खुलासा

---Advertisement---

भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाने ३ गडी राखून जोरदार विजय मिळवला आहे. या विजयासह वनडे मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. वेगवान गोलंदाज दीपक चाहर आणि संघाचा उपकर्णधार भुवनेश्वर कुमार हे दोघेही या सामन्याचे शिल्पकार ठरले आहेत. परंतु, सामना झाल्यानंतर भुवनेश्वर कुमारने विजयाचे श्रेय मुख्य प्रशिक्षक राहुल द्राविड यांना दिले आहे.

सामन्यानंतर झालेल्या मुलाखतीत भुवनेश्वर कुमारने म्हटले की, “आम्ही शेवटच्या षटकापर्यंत फलंदाजी करण्याचा विचार केला होता. आम्ही अधिकाधिक वेळ फलंदाजी करण्याचा प्रयत्न करत होतो. दोघांनी कुठलाही दबाव घेतला नव्हता. आम्ही परिस्थितीनुसार फलंदाजी करत होतो. दीपक चाहरने आवश्यक रनरेट वाढू दिला नाही.”

द्रविडच्या त्या रणनितीमुळे भारतीय संघाने जिंकला सामना
भुवनेश्वर कुमार म्हणाला की, “दीपक चाहरला वरच्या क्रमांकावर पाठवण्याचा निर्णय राहुल द्रविड यांचाच होता. तो राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय अ संघाकडून खेळला आहे. तिथे ही त्याने धावा केल्या आहेत. त्यामुळे द्रविडला माहीत होते की, तो फलंदाजी करू शकतो. त्यानंतर चाहरने उत्कृष्ट फलंदाजी करून हे सिद्ध देखील केले. आम्हा सर्वांना माहीत आहे की, तो फलंदाजी करू शकतो. त्याने रणजी ट्रॉफी स्पर्धेत अनेकदा फलंदाजी केली आहे.”

तसेच तो पुढे म्हणाला की, “आम्ही एकमेकांना हेच सांगत होतो की, आपल्याला शेवटपर्यंत खेळायच आहे. आम्ही याचा उल्लेख केलाच नाही की, आम्ही हा सामना जिंकू शकतो. इतकेच नव्हे तर जेव्हा ३ धावांची आवश्यकता होती, तेव्हाही आम्ही एकाच चेंडूचा विचार करत होतो.” (Rahul Dravid call to promote Deepak chahar in batting order reveals Bhuvneshwar Kumar)

भूवी – चाहरची विजयी भागीदारी
दुसऱ्या वनडे सामन्यात श्रीलंका संघाने भारतीय संघासमोर २७६ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंका संघातील गोलंदाजांनी भारतीय संघातील मुख्य फलंदाजांना लवकर माघारी धाडले होते. असे वाटू लागले होते की,श्रीलंका संघ या सामन्यात एकहाती विजय मिळवणार. परंतु, शेवटी दीपक चाहर आणि भुवनेश्वर कुमार यांच्या जोडीने ८४ धावांची भागीदारी करत भारतीय संघाला सामना जिंकून दिला. यामध्ये दीपक चाहरने ६९ धावांचे योगदान दिले तर, भुवनेश्वर कुमारने १९ धावांचे बहुमूल्य योगदान दिले.

महत्त्वाच्या बातम्या – 

दुखापतीतून सावरताच विराट कोहलीने सुरु केला सराव; ताबडतोड शॉट्स खेळताना दिसला कर्णधार, पाहा व्हिडिओ

जो धोनी, गांगुलीलाही जमला नाही तो विक्रम करण्याची शिखर धवनला आहे सुवर्णसंधी

भारीच! स्टार्कने टाकलेल्या चेंडूने बेल्स तर उडवलेच, पण स्टंपलाही उडवले दूरवर, फलंदाजही शॉक, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---