येत्या ऑगस्ट महिन्यात भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेची तयारी म्हणून भारत आणि काउंटी सिलेक्ट इलेव्हन या संघांमध्ये सराव सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली मैदानात उतरला नव्हता. हे पाहून सर्वच क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. पण बीसीसीआयने माहिती दिली होती की त्याला पाठीचा हलकासा त्रास होत असल्यामुळे तो सराव सामन्या सहभागी झाला नव्हता. परंतु आता क्रिकेट चाहत्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. कर्णधार विराट कोहली सराव करण्यासाठी मैदानात उतरला असून तो जोरदार फटकेबाजी करताना दिसून आला आहे.
विराट कोहली फलंदाजीचा सराव करत असतानाचा व्हिडिओ बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. विराट कोहलीची नेट्समधील फलंदाजी पाहून चाहत्यांनी अशी आशा व्यक्त केली आहे की, तो आगामी मालिकेत चांगल्या फॉर्ममध्ये दिसेल. या व्हिडीओमध्ये विराट कोहली कव्हर ड्राईव्ह, बचावात्मक शॉट खेळताना दिसत आहे. तसेच तो पुढे येऊन षटकार मारताना दिसून आला आहे.
Captain @imVkohli batting = Pure bliss #TeamIndia pic.twitter.com/5EUDxhLwgJ
— BCCI (@BCCI) July 21, 2021
विराट कोहलीची इंग्लंडमधील कामगिरी
विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अव्वल दर्जाचा फलंदाज आहे. त्याने प्रत्येक देशात जाऊन संघासाठी धावा केल्या आहेत. विराटने इंग्लंडमध्ये आतापर्यंत एकूण ११ कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामधे त्याला ३५.६३ च्या सरासरीने ७८४ धावा केल्या आहेत. मागच्या वेळी जेव्हा भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता, त्यावेळी विराट कोहलीने ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत ५९.३० च्या सरासरीने ५९३ धावा केल्या होत्या. या दरम्यान त्याने २ शतक आणि ३ अर्धशतक झळकावले होते.
विराटने चांगली फलंदाजी केली असताना देखील भारतीय संघाला मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आगामी कसोटी मालिकेत विराट कोहली आणि भारतीय संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. (Ind vs Eng: Virat Kohli barring practice video went viral on social media)
इंग्लंड विरुद्ध भारत संघातील पाच सामन्यांची कसोटी मालिका
पहिली कसोटी- ४ ते ८ ऑगस्ट, नॉटिंघम
दुसरी कसोटी- १२ ते १६ ऑगस्ट, लॉर्ड्स
तिसरी कसोटी- २५ ते २९ ऑगस्ट, लीड्स
चौथी कसोटी- २ ते ६ सप्टेंबर, द ओव्हल
पाचवी कसोटी- १० ते १४ सप्टेंबर, मॅनचेस्टर
महत्त्वाच्या बातम्या –
जो धोनी, गांगुलीलाही जमला नाही तो विक्रम करण्याची शिखर धवनला आहे सुवर्णसंधी
गिल, आवेश पाठोपाठ भारताचा अष्टपैलू इंग्लंड दौऱ्यातून बाहेर, सराव सामन्यात झाली दुखापत