भारतीय संघ सध्या आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धा खेळण्यात व्यस्त आहे. ही स्पर्धा टी-२० संघाचा कर्णधार म्हणून विराट कोहलीची शेवटची स्पर्धा असणार आहे. तर या स्पर्धेनंतर रवी शास्त्री यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कालावधी देखील संपणार आहे. रवी शास्त्रीनंतर हे पद भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू आणि राष्ट्रीय क्रिकेट ॲकेडमीचे अध्यक्ष राहुल द्रविड यांना दिले गेले आहे.
राहुल द्रविड हे भारतीय संघाचे पुढील मुख्य प्रशिक्षक असणार आहेत. हे पद मिळाल्यानंतर राहुल द्रविड हे भारतीय संघाचे २६ वे मुख्य प्रशिक्षक झाले आहेत.
रवी शास्त्रींनी २०१७ मध्ये स्वीकारले होते पद
रवी शास्त्री यांनी २०१७ नंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षकपद स्विकारले होते. तेव्हापासून भारतीय संघाने ४३ कसोटी, ७२ वनडे आणि ५२ टी-२० सामने खेळले आहेत. यापैकी २५ कसोटी सामन्यात, ५१ वनडे सामन्यात आणि ४० टी-२० सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवण्यात यश आले आहे. यादरम्यान भारतीय संघाने २ वेळेस ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाऊन कसोटी मालिका विजय मिळवला आहे.
भारतीय संघाला प्रशिक्षण दिलेल्या मुख्य प्रशिक्षकांची यादी
१) केके तारापोर – १९७१-१९७१
२) हेमू अधिकारी – १९७१-१९७४
३) गुलाबराय रामचंद- १९७५-१९७५
४) दत्ता गायकवाड – १९७८-१९७८
५)सलीम दुर्रानी – १९८०-१९८१
६)अशोक मांकड -१९८२-१९८२
७) पीआरमान सिंग -१९८२-१९८७
८)चंदू बोर्डे – १९८८-८९
९) बिशनसिंग बेदी – १९९०-१९९१
१०) अशोक मांकड-१९९१-१९९१
११) अब्बास अली बेग -१९९१-१९९२
१२) अजित वाडेकर -१९९२-१९९६
१३) संदीप पाटील -१९९६-९१९६
१४) मदन लाल -१९९६-१९९७
१५) अंशुमन गायकवाड – १९९७-१९९९
१६) कपिल देव -१९९९-२०००
१७) जॉन राईट -२०००-२००५
१८) ग्रेग चॅपेल – २००५-२००७
१९) लालचंद राजपूत – २००७-२००८
२०) गॅरी कर्स्टन -२००८ -२०११
२१) डंकन फ्लेचर -२०११-२०१५
२२) रवी शास्त्री – २०१५-१६
२३) संजय बांगर (प्रभारी) -२०१६-१६
२४) अनिल कुंबळे -२०१६-२०१७
२५) रवी शास्त्री – २०१७ ते २०२१
२६) राहुल द्रविड – २०२१
महत्त्वाच्या बातम्या-
नाणेफेक जिंका, सामना खिशात घाला! टी२० विश्वचषक सामन्यांमध्ये टॉस बजावतोय महत्त्वाची भूमिका, वाचा
पाकिस्तानचा गुरु बनणार गॅरी? भारताला बनविलेले विश्वविजेता
गोलंदाजाने फलंदाजाला काढले वेड्यात, सापळा रचून केले स्टंपिंग; पाहा विकेट ऑफ द मॅच!