---Advertisement---

केएल राहुलबद्दल धक्कादायक ब्रेकिंग! कोच द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, ‘Asia Cup 2023मधील…’

Rahul-Dravid-And-KL-Rahul
---Advertisement---

आशिया चषक 2023 स्पर्धेविषयी मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी भारतीय संघाचा स्टार क्रिकेटपटू केएल राहुल याच्याविषयी आहे. भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याने केएल राहुल आशिया चषक 2023 स्पर्धेत खेळणार की नाही, याविषयी मोठे भाष्य केले आहे. चला तर, द्रविड नेमका काय म्हणालाय, हे जाणून घेऊयात…

काय म्हणाला द्रविड?
भारतीय संघाचा दिग्गज माजी कर्णधार आणि सध्याचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) याने केएल राहुल (KL Rahul) याच्याविषयी मोठे भाष्य केले. त्याने स्टार स्पोर्ट्सशी (Star Sports) बोलताना पुष्टी केली, की केएल राहुल आशिया चषक 2023 (KL Rahul Asia Cup 2023) स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यांना उपलब्ध नसेल.

राहुल द्रविड म्हणाला, “केएल राहुल हा वेगाने बरा होत आहे, पण तो आशिया चषक 2023 स्पर्धेतील भारतीय संघाच्या पहिल्या दोन पाकिस्तान आणि नेपाळविरुद्धच्या सामन्यांना उपलब्ध नसेल.” त्यामुळे आता क्रिकेटप्रेमी भारतीय संघासाठी हा धक्का असल्याचे म्हणत आहेत.

आशिया चषकाला सुरुवात कधी?
आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील भारतीय संघाचा पहिला सामना 2 सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. यानंतर भारताचा दुसरा सामना 4 सप्टेंबर रोजी नेपाळविरुद्ध खेळला जाणार आहे. हे दोन्ही सामने श्रीलंकेच्या पल्लेकेले मैदानावर पार पडणार आहेत.

राहुल द्रविडची वनडे कारकीर्द
केएल राहुल (KL Rahul) याच्या वनडे कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत भारताकडून 54 वनडे सामने खेळले आहेत. यातील 52 डावात त्याने 45.14च्या सरासरीने 1986 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने 5 शतके आणि 13 अर्धशतकांचा पाऊस पाडला आहे. राहुलने त्याचा अखेरचा वनडे सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध याचवर्षी 22 मार्च रोजी खेळला होता. (Rahul Dravid confirms KL Rahul won’t be available for the first 2 games of Asia Cup 2023)

हेही वाचलंच पाहिजे-
ना राशिद, ना बोल्ट, विश्वचषकात ‘हा’ गोलंदाज घेणार सर्वाधिक विकेट्स; विंडीजच्या दिग्गजाने केलीय भविष्यवाणी
जबरदस्त फॉर्ममध्ये असलेले ‘हे’ 3 पाकिस्तानी खेळाडू Asia Cup 2023मध्ये भारतासाठी ठरू शकतात मोठा धोका, वाचा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---