---Advertisement---

राहुल द्रविडने मानद डॉक्टरेट घेण्यास दिला होता नकार, कारण ऐकून कराल कौतुक

On: बुधवार, नोव्हेंबर 3, 2021 10:22 PM
---Advertisement---

भारतात माजी कर्णधार राहुल द्रविडला केवळ एक चांगला क्रिकेटपटू म्हणूनच नाही, तर एक उत्तम व्यक्ती म्हणूनही ओळखले जाते. त्याच्या शांत स्वाभावाचे आणि नम्र वर्तवणूकीचे सर्वत्र कौतुक होत असते. सध्या राहुल द्रविड भारतीय संघाचा नवा प्रशिक्षक बनला आहे.

वास्तविक, सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ टी -२० विश्वचषकानंतर संपेल. त्याचबरोबर द्रविडचा एनसीए प्रमुख म्हणून दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. द्रविडच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ नुकताच श्रीलंका दौऱ्यावर गेला होता. नेहमी मेहनतीवर विश्वास ठेवणाऱ्या द्रविडला भारताची बेंच स्ट्रेंथ मजबूत करण्याचे श्रेय दिले जाते. पृथ्वी शॉ, शुभमन गिल सारखे अनेक भारतीय क्रिकेटपटू त्याच्या देखरेखीखाली तयार झाले आहेत.

लोकांना ड्रेसिंग रूम म्हणून, खेळाडू म्हणून आणि प्रशिक्षक म्हणून द्रविडच्या अनेक कथा माहीत आहेत. पण त्याच्या काही अशा कथा आहेत, ज्या अजूनही लोकांना माहिती नाहीत.

राहुल द्रविडने मानद डॉक्टरेट घेण्यास दिला होता नकार
फार कमी लोकांना माहीत असेल की, राहुल द्रविडने मानद डॉक्टरेट घेण्यास नकार दिला होता. कारण, त्याला त्याचा अभ्यास करून पदवी घ्यायची होती. खरं तर, २०१७ मध्ये, बेंगळुरू विद्यापीठाला द्रविडला मानद डॉक्टरेट देण्याची इच्छा होती. परंतु, द्रविडने पदवी घेण्यास नकार दिला. कारण त्याने अभ्यास केल्यानंतरच ती घ्यायला आवडेल, असे सांगितले.

एवढेच नाही तर अनेक चाहत्यांना हे देखील माहित नसेल की, २००४ मध्ये द्रविडला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तेव्हा त्याला स्वतःला नायक म्हणण्यात आनंद झाला नाही. त्यांचा असा विश्वास आहे की, वास्तविक नायक सैनिक, वैज्ञानिक आणि डॉक्टर आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

उमेश यादव ‘या’ कारणामुळे कसोटी संघातून होऊ शकतो ‘आउट’

‘हे’ ३ खेळाडू घेऊ शकतात रहाणेची जागा; भारताच्या कसोटी संघाचे मिळू शकते उपकर्णधारपद

मैदानाबाहेरील कला! जेमिमाह रॉड्रिग्सने गिटारवर ‘दिल चाहता हैं’ चे प्रसिद्ध गाणे केले सादर; पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---