सध्या पॅरिस ऑलिम्पिक सुरु आहे. त्यामध्ये मनू भाकरनं (Manu Bhaker) भारताला पहिलं पदक जिंकून दिलं. मनू भाकरनं (Manu Bhaker) यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवलं. तत्पूर्वी 2028मध्ये लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. त्यावर भारताचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी रविवारी सांगितले की, क्रिकेटपटू या खेळांचा भाग होण्यासाठी खूप उत्सुक आहेत.
राहुल द्रविड म्हणाले, “मी या संदर्भात ड्रेसिंग रुममध्ये खूप चर्चा ऐकल्या आहेत. खेळाडू 2026मध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषक आणि 2028च्या ऑलिम्पिकसह 2027मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाबाबतही चर्चा करत आहेत. मी त्यांना असे म्हणताना ऐकले आहे की, ऑलिम्पिक 2028मध्ये आहे. ते म्हणाले, क्रिकेटपटूंनाही सुवर्णपदक जिंकायचे आहे. व्यासपीठावर उभे राहायचे आहे आणि मोठ्या क्रीडा स्पर्धेचा भाग होऊन अनेक खेळाडूंशी संवाद साधायचा आहे.”
पुढे बोलताना राहुल द्रविड (Rahul Dravid) म्हणाले, “एका महान क्रिकेट स्पर्धेचं माझं स्वप्न आहे, मला आशा आहे की, भारतीय क्रिकेट पुरुष आणि महिला संघ सुवर्णपदक जिंकतील. पण इथल्या प्रत्येकासाठी माझी आणखी इच्छा आहे की, क्रिकेटचं समर्थन करण्यासाठी आणि इतर जगाला क्रिकेट किती मोठा आणि महान खेळ आहे हे दाखवण्यासाठी बरेच भारतीय चाहते लॉस एंजेलिसमध्ये येऊन सपोर्ट करण्यासाठी सज्ज असतील.”
राहुल द्रविडचं (Rahul Dravid) वय सध्या 51 वर्ष आहे. 2024च्या झालेल्या आयसीसी टी20 विश्वचषकानंतर (ICC T20 World Cup) द्रविडचा भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ संपला. त्यांनी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी कार्यकाळ वाढविण्यासाठी इच्छा व्यक्त केली नाही. भारतानं त्यांच्या मार्गदर्शनाखाली 2024च्या टी20 विश्वचषकावर नाव कोरलं.
द्रविडनं भारतासाठी 1996ला पदार्पण केलं होतं. त्यांनी भारतासाठी 164 आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यांनी 13,288 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्यांची सरासरी 52.31 राहिली. कसोटीमध्ये त्यांच्या नावावर 63 अर्धशतक आणि 36 शतक आहेत. त्यामध्ये त्यांची सर्वोच्च धावसंख्या 270 राहिली आहे. तर 344 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात त्यांनी भारतासाठी 10,889 धावा केल्या आहेत. यादरम्यानं त्यांचा स्ट्राईक रेट 71.23 आणि सरासरी 39.16 राहिली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यांची सर्वोच्च धावसंख्या 153 राहिली आहे. द्रविडनं भारतासाठी केवळ 1 टी20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. त्यामध्ये त्यांनी 147.61 स्ट्राईक रेटसह 31 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
…तर ‘थाला’ आयपीएलचा आणखी एक हंगाम खेळणार, लागू व्हायला पाहिजे हा खास नियम
शूटिंगमध्ये भारताच्या पदरी निराशा, पदकाच्या लढतीत 20 वर्षीय रमिता जिंदालचं स्वप्न भंगलं
“आम्ही आता अशाच प्रकारे खेळू…”, भारताच्या जबरदस्त विजयानंतर कर्णधार सूर्याची मोठी प्रतिक्रिया