नवी दिल्ली। ‘द वॉल’ नावाने प्रसिद्ध असलेला भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडने आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघातून केली होती. परंतु राजस्थान रॉयल्ससोबतचा त्याचा कार्यकाळ लोकांना अधिक आठवतो. आरसीबीसोबत त्याने पहिले ३ मोसम खेळले. त्यानंतर त्याने आयपीएल २०११ला राजस्थान रॉयल्सचा मार्ग अवलंबला. त्याचबरोबर राजस्थान रॉयल्सच्या फ्रंचायझीमध्ये महत्त्वाची भूमिका निभावली. फलंदाजीव्यतिरिक्त द्रविडने मार्गदर्शकाच्या भूमिकेतही काम केले तसेच व्यवस्थापनाचा भाग म्हणूनही त्याने मोठी भूमिका निभावली होती.
द्रविडच्या आगमनाने राजस्थान रॉयल्सवर पडला प्रभाव
द्रविडच्या आगमनाने राजस्थान रॉयल्सने स्मार्ट खेळाडूंची खरेदी सुरु केली. २०११ आणि २०१२ मध्ये, राजस्थानने एकही अविस्मरणीय सामना खेळला नाही आणि ते गुणतालिकेत सहाव्या आणि सातव्या क्रमांकांवर राहिले. परंतु त्यानंतर २०१३ च्या हंगामात राजस्थानने तिसरे स्थान मिळविले. त्यादरम्यान प्रतिभावान खेळाडूंपैकी एक, जो संघासाठी शानदार कामगिरी करायचा, तो खेळाडू म्हणजेच ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ब्रॅड हॉज होता.
ऑस्ट्रेलियन फलंदाज ब्रॅड हॉज नव्हता विस्फोटक फलंदाज
“आरसीबीनंतर मी राजस्थान रॉयल्स संघात गेलो तसेच मी एक कर्णधार, प्रशिक्षक आणि व्यवस्थापकाच्या भूमिकेत आलो. आम्ही खूप सारा डेटा आणि आकडेवारी पाहत होतो. राजस्थानमध्ये आम्ही एक मनीबॉल संघ होतो. बजेटच्या ४०-६० टक्क्यांसह आम्हाला अव्वल संघांशी स्पर्धा करायची होती. प्रत्येक संघाकडे भरपूर डेटा आणि ज्ञान असते. त्यामुळे अव्वल संघांशी स्पर्धा करणे सोपे नव्हते, ”द्रविडने इनसाईट विरुद्ध इनसाईट पॅनेल चर्चेत म्हटले.
द्रविडने हॉजच्या या ताकदीचा केला वापर
“आम्ही ज्या गोष्टींवर लक्ष दिले, त्यांपैकी एक होता ब्रॅड हॉज. ज्याची ऑस्ट्रेलियामधील आंतरराष्ट्रीय टी२०ची आकडेवारी शानदार होती आणि त्याने कदाचित ५-६ आयपीएल मोसम खेळले होते. पण त्याचबरोबर भारतातील सरासरी किंवा खराब आकडेवारी होती. एकदा आम्ही डेटाकडे बारकाईने पाहिले, तर लक्षात आले की तो भारतात का एवढा संघर्ष का करत आहे. तो वेगवान गोलंदाजीविरुद्ध खूप चांगली फलंदाजी करणारा खेळाडू होता. परंतु तो फिरकी गोलंदाजी आणि लेगस्पिन विरुद्ध फारसा चांगला नव्हता. पण वेगवान गोलंदाजीविरुद्ध चांगली कामगिरी करण्याची अतुलनीय ताकद त्याच्याकडे होती,” असेही तो पुढे म्हणाला.
डेथ ओव्हर्समधील तज्ज्ञ म्हणून केला हॉजचा वापर
हॉज कधीही आंतरराष्ट्रीय टी२० विस्फोटक फलंदाज नव्हता. जसे ख्रिस गेल किंवा एबी डिविलियर्स होते. परंतु त्याला द्रविडप्रमाणे डाव कसा पुढे घेऊन जायचे हे माहिती होते. भारतातील खराब विक्रम असूनही द्रविडने हॉजला टी२० मधील चांगला फलंदाज म्हणून रुपांतरित करण्याचा मार्ग शोधला.
“आम्हाला ज्या गोष्टी दिसल्या त्यातील एक म्हणजे खेळाची अवस्था, ज्यामध्ये हॉज सारखा व्यक्ती फक्त वेगवान गोलंदाजी खेळतो. आणि आम्ही शेवटच्या ४-५ षटकांत पाहतो, जिथे प्रत्येकजण आपल्या सर्वोत्कृष्ट डेथ ओव्हर्स गोलंदाजांकडे गोलंदाजी सोपवतात. आम्ही त्याचवेळी निर्णय घेतला की आम्ही त्याला लिलावात विकत घेऊ आणि सामन्यात अंतिम ६ ते ७ षटकांत त्याला फलंदाजीला नेऊ,” असेही द्रविड म्हणाला.
द्रविडच्या आयडियाने केली कमाल, हॉजने खेळली तुफान खेळी-
हॉज हा असा ऑस्ट्रेलियन फलंदाज आहे, ज्याला स्वत:च्या फलंदाजी क्षमतेवर अभिमान आहे. तो ऑस्ट्रेलियामध्ये वरच्या फळीत फलंदाजी करतो. जेव्हा आम्ही त्याला सर्व सांगितले, तेव्हा तो सुरुवातीला यासाठी तितकासा सज्ज नव्हता. पण आम्ही नंतर त्याला डाटा दाखवू शकलो आणि वेगवान गोलंदाजांविरुद्ध त्याचे दाखवू शकलो. तसेच त्याला समजावू शकलो की आपल्या संघासाठी हे किती महत्त्वाचे आहे. कारण आपल्या संघात आक्रमकतेची क्षमता नव्हती, जसे सीएसकेकडे धोनी आहे, मुंबई इंडियन्सकडे पोलार्ड किंवा आरसीबीकडे डिविलियर्स आहे,” असेही तो म्हणाला.
हॉजचे नशीब बदलले, जेव्हा त्याने राजस्थान रॉयल्स संघाच्या पुढील २ मोसमात अनुक्रमे २४५ आणि २९३ धावा केल्या. त्यामध्ये त्याने २०१२ मध्ये १४० आणि २०१३ मध्ये १३४ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. २०१३मध्ये राजस्थान रॉयल्स संघाला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्याने ४१.८५ च्या सरासरीने फलंदाजी करत आपले योगदान दिले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
आजपासून इंग्लंड पाकिस्तान कसोटी मालिकेला सुरुवात, जाणून घ्या सर्वकाही
कोरोनाबाधीताबरोबर घालवला वेळ, दोन मोठे क्रिकेटर कॅरेबियन लीगमधून बाहेर
धोनीने सीएसकेला सांगितलं होतं; त्या खेळाडूला घेऊ नका, तो टीमची वाट लावेल
ट्रेंडिंग लेख –
आजच्याच दिवशी ८८ वर्षांपूर्वी सीके नायडूंनी मारला होता तो ऐतिहासिक षटकार
वाढदिवस विशेष: शतकातील सर्वोत्तम झेल घेणारा वेसबर्ट ड्रेक्स
५ असे क्रिकेटर, जे आयपीएल २०२० दरम्यान स्वत:ला फिनीशर म्हणून सिद्ध करायला उत्सुक