आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर याला क्रिकेटचा देव म्हणून संबोधले जाते. अनेकदा क्रिकेटविश्वातील सर्वोत्तम फलंदाज कोण याविषयी देखील चर्चा होत असते. भारतीय संघाचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ यांनी देखील या बाबतीत आपले मत मांडले आहे. नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना पृथ्वीने एका दिग्गज भारतीय क्रिकेटपटूला क्रिकेटचा ‘गॉडफादर’ म्हटले आहे.
लहानपणापासून आहे सचिनशी नाते
मुंबईत वाढलेला पृथ्वी शॉ अगदी लहान वयापासून मुंबई क्रिकेट वर्तुळात प्रसिद्ध आहे. शालेय क्रिकेटमध्ये विक्रमी खेळी केल्यानंतर तो चर्चेत आला होता. तसेच, तो नेहमी सचिन तेंडुलकरकडून टीप्स घेताना देखील दिसतो. सचिनचा मुलगा अर्जुन त्याचा खास मित्र आहे. असे असले तरी, पृथ्वीने क्रिकेटचा ‘गॉडफादर’ म्हणून दुसऱ्याच भारतीय क्रिकेटपटूचे नाव घेतले. पृथ्वीने क्रिकेटचा ‘गॉडफादर’ म्हणले, हा खेळाडू म्हणजे भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड होय.
द्रविडच्या मार्गदर्शनाखाली जिंकला विश्वचषक
पृथ्वी शॉ याच्या नेतृत्वात भारतीय संघाने २०१८ मध्ये न्यूझीलंड येथे झालेला एकोणीस वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक जिंकलेला. या संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड होता. त्यानंतर देखील द्रविड अनेक वेळा पृथ्वीला कारकिर्दीच्या विविध टप्प्यावर मार्गदर्शन करताना दिसला आहे. राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले रिषभ पंत, ईशान किशन, शुबमन गिल, खलील अहमद, कार्तिक त्यागी, देवदत्त पडिक्कल यांच्यासारखे अनेक खेळाडू भारतीय संघाला मिळाले आहेत.
भारतीय संघातून बाहेर आहे पृथ्वी
भारतातील सर्वात गुणवान क्रिकेटपटू असलेला पृथ्वी सध्या भारतीय संघातून बाहेर आहे. आयपीएल २०२० व ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील खराब कामगिरीनंतर त्याला डच्चू देण्यात आला होता. मात्र, विजय हजारे ट्रॉफी व आयपीएल २०२१ मध्ये शानदार कामगिरी केल्यानंतर त्याच्या भारतीय संघातील पुनरागमनाच्या आशा उंचावल्या होता. परंतु, इंग्लंड दौऱ्यासाठी जाणाऱ्या भारतीय संघात त्याची निवड केली गेली नाही. पुढील महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघात तो सामील होऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
धक्कादायक! भारताच्या अव्वल गोलंदाजांच्या वडिलांचे निधन, यकृताच्या कर्करोगाने होते त्रस्त
आधी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करत अडवला चेंडू, नंतर स्वत:च फेकला सीमारेषेबाहेर! पाहा विनोदी व्हिडिओ
कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक षटकार ठोकत हे भारतीय खेळाडू ठरले आहेत सिक्सर किंग