---Advertisement---

मॅच विनर खेळाडूची प्रशिक्षक द्रविडबद्दल मोठी प्रतिक्रिया; म्हणे, ‘ते भारताचे गुंडे आहेत’

On: शुक्रवार, जुलै 23, 2021 10:02 AM
---Advertisement---

श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत भारतीय संघाने आतापर्यंत उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. भारताने पहिले दोन एकदिवसीय सामने जिंकून मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली. विशेषत: ज्याप्रकारे भारताने दुसरा एकदिवसीय सामना जिंकला, त्यामुळे सर्व चाहत्यांची आणि क्रिकेट तज्ञांची मने खेळाडूंनी जिंकली आहेत.

दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात भारताच्या विजयात दीपक चाहरने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याने गोलंदाजी करत 2 बळी घेतले होते. त्यानंतर त्याने 8 व्या क्रमांकावर फलंदाजी करत नाबाद 69 धावा करत संघाला दमदार विजय मिळवून दिला होता. हा विजय भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासाठी सुद्धा महत्त्वपूर्ण होता. कारण प्रशिक्षक म्हणून त्यांचा हा पहिलाच मालिका विजय आहे. मात्र या मालिका विजयानंतर सामना विजेता खेळाडू दीपक चाहर याने राहुल द्रविड यांना भारताचा गुंड म्हटले आहे.

दुसर्‍या एकदिवसीय सामन्यातील विजयानंतर दीपक चाहरने राहुल द्रविड यांची चेष्टा करत असे विधान केले आहे. दीपक चाहर म्हणाला की, ‘राहुल द्रविड सर केवळ इंदिरानगरच नव्हे तर संपूर्ण भारताचे गुंड बनले आहेत.’

काही दिवसांपूर्वीच द्रविड यांची एक जाहिरात आली होती, ज्यामध्ये ते गुंडगिरी करताना दिसून येत होते. याच जाहिरातीवरुन दीपक चाहरने मुख्य प्रशिक्षकांवर ही प्रतिक्रिया दिली आहे.

दीपकला राहुल द्रविडने दिला आत्मविश्वास
दुसरा एकदिवसीय सामना जिंकल्यानंतर दीपकने राहुल द्रविड यांचे खूप कौतुकही केले होते. प्रशिक्षक द्रविड यांनी त्याला चांगली फलंदाजी करण्याचा आत्मविश्वास दिला असल्याचे त्याने सांगितले. दीपक म्हणाला की, ‘राहुल द्रविड सरांनी मला सर्व षटके खेळायला सांगितली होती. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला होता. ते म्हणाले असेही म्हणाले होते की, मी 7 नंबरवर चांगला फलंदाज बनू शकतो.’

दीपक चाहरने ही राहुल द्रविड यांनी त्याच्यावर दाखवलेला विश्वास खरा ठरवला. भारतीय संघावर एकवेळ 160 धावांमध्ये 6 गडी गमावून बसला होता. परंतु अशा कठीण परिस्थितीत दीपक मैदानावर आला आणि जबरदस्त फलंदाजी करत 5 चेंडू आणि 3 गडी राखून संघाला सामना जिंकून दिला.

तसेच आपल्या फलंदाजीचे श्रेय चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीलाही दिले आहे. दीपकने सांगितले की, धोनी अनेक सामन्यांत शांततेत लक्ष्याचा पाठलाग करताना दिसला आहे आणि तो अनुभव त्याच्या उपयोगी पडला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

टी२० सामन्याच्या शेवटच्या षटकांत मिलरने ‘इतके’ षटकार ठोकत केला विश्वविक्रम, धोनीलाही टाकले मागे

विराटसेनेला दुखापतींनी घेरले, बीसीसीआय नवख्या खेळाडूंना करणार इंग्लंडला रवाना?

कोणाची फलंदाजी तर कोणाची गोलंदाजीत कमाल! सराव सामना अनिर्णीत राहूनही भारताला ‘असा’ झाला फायदा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---