---Advertisement---

‘ते द्रविड सरच होते, ज्यांच्यामुळे माझी कारकिर्द घडली,’ युवा खेळाडूची प्रामाणिक कबुली

On: मंगळवार, जून 1, 2021 12:38 AM
---Advertisement---

भारतीय क्रिकेटची नवी पिढी निर्माण करण्याचे सर्वात मोठे श्रेय भारताचा माजी कर्णधार व क्रिकेटविश्वामध्ये ‘द वॉल’ नावाने प्रसिद्ध असणारा राहुल द्रविड याला जाते. भारतीय संघामध्ये सध्या खेळत असलेल्या अजिंक्य रहाणे, केएल राहुल, पृथ्वी शॉ, रिषभ पंत, शुबमन गिल तसेच आयपीएल गाजवणाऱ्या देवदत्त पडिक्कल, आवेश खान, संजू सॅमसन या खेळाडूंच्या जडणघडणीत त्याचा मोठा वाटा आहे. यामध्ये आता आणखी एक नाव जोडले गेले असून, या युवा खेळाडूने स्वतः द्रविडमुळे माझ्या फलंदाजीत सुधारणा झाल्याचे कबूल केले.

राहुल सरांमुळे माझ्या फलंदाजीत सुधारणा
दक्षिण आफ्रिकेत झालेल्या २०२० च्या एकोणीस वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व केलेल्या प्रियम गर्ग याने एका मुलाखतीत बोलताना आपल्या कारकीर्दीविषयी अनेक गोष्टी सांगितल्या.

प्रियम म्हणाला, “राहुल सरांनी दिलेल्या टिप्स माझ्या फलंदाजीत कामी आल्या. ते मैदानावर आणि मैदानाबाहेर देखील नेहमी सकारात्मक बाबी सांगतात. एक खेळाडू आणि माणूस म्हणून ते महान आहेत. युवा संघासोबत इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर त्यांनी मला मोलाची मदत केली.”

भारताचे भविष्य घडवत आहे द्रविड
राहुल द्रविड हा भारताच्या सर्वकालीन महान क्रिकेटपटूंपैकी एक आहे. खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्याने भारतीय क्रिकेटचे भविष्य सुधारण्यासाठी युवा संघाचे प्रशिक्षकपद भूषवले. त्याच्याच मार्गदर्शनाखाली पृथ्वी शॉच्या नेतृत्वात भारताच्या युवा संघाने २०१८ मध्ये एकोणीस वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट विश्वचषकात विजय संपादन केला होता. तर, २०१६ व २०२० मध्ये संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. सध्या तो बेंगलोरस्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत संचालक म्हणून काम पाहतो.

प्रियमने केले आहे भारताचे नेतृत्व
देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रियम गर्गने २०२० युवा विश्वचषकात भारताचे नेतृत्व केले होते. आपल्या कुशल नेतृत्वाचा व अप्रतिम फलंदाजीच्या जोरावर त्याने संघाला अंतिम फेरीपर्यंत नेले. प्रियम आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचे प्रतिनिधित्व करतो. त्याने २०२० मध्ये हैदराबाद संघातून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

‘या’ क्रिकेटपटूंनी युवा वयातच लीलया पेलली कर्णधारपदाची जबाबदारी, एका भारतीयाचा समावेश

अशी ३ कारणे, ज्यामुळे युएईत आयपीएल खेळवण्याचा निर्णय ठरू शकतो अयशस्वी

डोळ्याची पापणी लवण्याआधी यष्टीरक्षकाने उडवली दांडी, व्हिडिओ पाहून आठवेल ‘एमएस धोनी’!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---