---Advertisement---

कार्तिक टी२० विश्वचषक खेळणार?, प्रशिक्षक राहुल द्रविडने दिले महत्त्वाचे संकेत

Dinesh-Karthik-Rahul-Dravid
---Advertisement---

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी दिनेश कार्तिकच्या फलंदाजीचे कौतुक केले आहे. बंगळुरूमध्ये पावसामुळे ५वा टी२० सामना रद्द झाल्यानंतर द्रविडने राजकोटमध्ये दिनेश कार्तिकच्या खेळीला रेट केले.  ३७ वर्षीय दिनेश कार्तिकने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेद्वारे भारतीय संघात शानदार पुनरागमन केले. राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या सामन्यात, त्याने २७ चेंडूत ५५ धावा केल्या, ज्यामुळे टीम इंडियाला टॉप ऑर्डरच्या पडझडीनंतर सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. अशाप्रकारे दिनेश कार्तिक हा सर्वात लहान फॉरमॅटमध्ये अर्धशतक झळकावणारा सर्वात वयस्कर भारतीय फलंदाज ठरला.

सामन्यानंतर पत्रकार परिषदेत राहुल द्रविड म्हणाला की, “त्याची विशेष खेळाडू म्हणून निवड करण्यात आली होती. गेल्या २-३ वर्षात तो अपवादात्मकरित्या चांगले करत आहे. त्याने त्याच्या निवडीचे समर्थन केले हे चांगले आहे. जेव्हा आम्हाला चांगली धावसंख्या करण्यासाठी शेवटच्या ५ षटकांमध्ये त्या मोठ्या कामगिरीची गरज होती, तेव्हा कार्तिक आणि हार्दिक पांड्याने आमच्यासाठी चांगली फलंदाजी केली. कार्तिक आणि पंड्या हे दोघेही अडचणीच्या काळात गेम चेंजर्स असल्याचे सिद्ध झाले आहे. अखेरच्या ५-६ षटकांमध्ये दबावाखाली डाव हाताळणे हे दोन्ही खेळाडूंना हाताळण्याचा उत्तम मार्ग आहे.

प्रशिक्षक पुढे म्हणाले की, “कार्तिकला अशा प्रकारे खेळताना पाहणे खूप छान आहे. तो आमच्यासाठी अनेक पर्याय उघडतो. अशा प्रकारची खेळी करत कार्तिक धमाका करत आहे आणि आम्ही ते आणखी पाहण्यास उत्सुक आहोत.”

दरम्यान, राहुल द्रविड यांनी कार्तिक बद्दल केलेल्या स्तुतीमुळे आता आगामी टी२० विश्वचषकात कार्तिकला संघात स्थान मिळणार असल्याच्या चर्चांना उधांन आलं आहे. शिवाय कार्तिकची कारकिर्द संपल्याचे भाकित वर्तवणाऱ्या क्रिकट जाणकारांच्या तोंडाला वचक बसल्याचे देखील स्पष्ट होत आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

भारतीय माजी दिग्गजांनी थेट सचिन अन् गिलख्रिस्टसोबत केली पंतची तुलना, म्हणाले…

रणजी चषकाच्या अंतिम सामन्यात आचरेकरांचे ‘हे’ दोन शिष्य भिडणार!

‘आम्ही मालिका जिंकण्यासाठी उत्सुक’, राहुल द्रविडने व्यक्त केली भावना

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---