---Advertisement---

नाम बडे दर्शन छोटे! कोच द्रविडची रणनिती ठरतेय फेल, केला पूर्ण अपेक्षाभंग

On: सोमवार, ऑगस्ट 14, 2023 11:10 AM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याची सांगता पराभवाने झाली. वेस्ट इंडीज आणि  भारत यांच्यातील अखेरचा टी20 सामना रविवारी (13 ऑगस्ट) खेळला गेला. फ्लोरिडामध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाला 8 गड्यांनी पराभव पत्करावा लागला. यासह मालिका वेस्ट इंडीजने आपल्या नावावर केली. कसोटी व वनडे मालिका गमावल्यानंतर यजमान संघासाठी हा पहिला विजय होता. असे असले तरी भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षक म्हणून कारकिर्दीवर अनेक जण आता प्रश्नचिन्ह उपस्थित करू लागले आहेत.

भारताच्या सर्वकालीन महान फलंदाजांपैकी एक असलेल्या द्रविड याच्याकडे 2021 टी20 विश्वचषकानंतर भारतीय संघाचे नेतृत्व देण्यात आलेले. रवी शास्त्री यांच्या मोठ्या कार्यकाळानंतर ही जबाबदारी द्रविडने स्वीकारली. भारतीय संघाचा आयसीसी स्पर्धामधील विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचे प्रमुख आव्हान त्याच्यासमोर होते. मात्र, तो आतापर्यंत तरी यामध्ये अपयशी ठरलेला आहे. विशेष म्हणजे मायदेशातील कामगिरी सोडल्यास भारतीय संघ विदेशात देखील संघर्ष करताना दिसून आला.

द्रविडने कार्यकाळ सांभाळल्यापासून अनेक महत्त्वाच्या मालिका व आयसीसी स्पर्धांमध्ये भारतीय संघ अपयशी ठरला. मुख्य प्रशिक्षक बनल्यानंतर द्रविड याची पहिली परीक्षा दक्षिण आफ्रिकेत होती. मात्र, दक्षिण आफ्रिकेत कसोटी व वनडे मालिका भारतीय संघाला गमवावी लागली. यानंतर इंग्लंडमध्ये एकमेव कसोटी भारताने हरली. मागील वर्षी आशिया चषकाच्या अंतिम फेरीत पोहचण्यात भारतीय संघाला अपयश आलेले. तर, टी20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताचा दारुण पराभव झालेला. यानंतर भारताने ऑस्ट्रेलिया व बांगलादेशविरुद्ध वनडे मालिका गमावल्या.

जून महिन्यात भारतीय संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पराभूत व्हावे लागले होते. त्यानंतर आता हा पराभव पाहावा लागल्याने द्रविड याच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहेत. आगामी काळात भारताला आशिया चषक व वनडे विश्वचषक खेळायचा आहे. द्रविड याचा कार्यकाळ विश्वचषकापर्यंतच आहे. तिथे भारताला यश लाभल्यासच हा कार्यकाळ पुढे वाढवला जाऊ शकतो.

(Rahul Dravid Not Successful As Team India Head Coach Next Mission Is World Cup)

महत्वाच्या बातम्या –
तिलक वर्माने घेतली कारकिर्दीतील पहिली आंतरराष्ट्रीय विकेट, फलंदाजाच्या रूपातही केली होती मोठी कामगिरी 
वेस्ट इंडीज दौऱ्यावर संजू पूर्णपणे फ्लॉप! खराब कामगिरीने पुन्हा आला चाहत्यांच्या निशाण्यावर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---