भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानची चार सामन्यांची कसोटी मालिका सोमवारी (13 मार्च) समाप्त झाली. अहमदाबाद येथे झालेला अखेरचा सामना अनिर्णित राहिल्यानंतर भारतीय संघाने ही मालिका 2-1 अशी आपल्या नावे केली. मात्र हा सामना सुरू असतानाच भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे लक्ष साडेबारा हजार किलोमीटर दूर असलेल्या ख्राईस्टचर्च कसोटीकडे लागले होते.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात यापूर्वी ऑस्ट्रेलियाने धडक मारली होती. या अंतिम सामन्यातील दुसरा संघ बनण्यासाठी भारतीय संघाला अहमदाबाद कसोटी जिंकणे गरजेचे होते. भारत ही कसोटी जिंकण्यात अपयशी ठरल्यास, भारताला न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यावर अवलंबून राहावे लागणार होते. या मालिकेत श्रीलंकेने 2-0 असा विजय मिळवल्यास श्रीलंका अंतिम फेरीत प्रवेश करणार होती. या दोन पैकी एक सामना जरी अनिरणेत राहिला तरी भारतीय संघाला अंतिम फेरीत प्रवेश मिळणार होता.
न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सामन्याचा पाचवा दिवस ख्राईस्टचर्च येथे खेळला जात होता. न्यूझीलंडला विजयासाठी 285 धावा करणे गरजेचे होते. न्यूझीलंडने विजयाच्या इराद्याने फलंदाजी केल्याने त्यांचे काही बळी गेले. या सामन्याची जितकी चिंता न्यूझीलंडच्या संघाला होती तितकीच भारतीय संघाला देखील लागलेली.
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यानंतर बोलताना म्हटले,
“खोटे सांगणार नाही मात्र आमची नजर त्या सामन्यावर देखील होती. ज्यावेळी न्यूझीलंडचे फलंदाज बाद होते त्यावेळी आम्हाला असे वाटत होते की, हे का उगीच आक्रमक खेळतायेत? मात्र आम्हाला त्यांना देखील थोडेसे धन्यवाद द्यावेच लागतील.”
न्यूझीलंड संघाने अखेरच्या चेंडूवर हा थरारक सामना दोन गडी राखून जिंकला. केन विलियम्सनने झुंजार शतक झळकावत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
(Rahul Dravid Said We Are Looking Closely Newzealand Vs Srilanka Test)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मालिकावीर पुरस्काराच्या 2.5 लाखांची अश्विन-जडेजाने केली चुकीची वाटणी? व्हिडिओ जोरदार व्हायरल
टॉसचा निकाल दिल्लीच्या पारड्यात, दोन बदलांसह मैदानात उतरणार राजधानी; RCB पहिल्या विजयासाठी सज्ज