---Advertisement---

कोलकाता कसोटीपुर्वीच द्रविडची जोरदार बॅटींग, दिले दादाला हे महत्त्वाचे सल्ले

---Advertisement---

22 नोव्हेंबरला कोलकाता येथे भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघात दुसरा कसोटी सामना पार पडणार आहे. हा कसोटी सामना दिवस-रात्र (Day-Night Test Match) कसोटी सामना असणार आहे. हा सामना व्यवस्थित पार पडण्यासाठी बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) मोठी मेहनत घेतली आहे.

या कसोटी सामन्यात भारतात पहिल्यांदाच गुलाबी चेंडूचा वापर करण्यात येणार आहे.

या डे-नाईट कसोटी सामना यशस्वी होण्यासाठी मूलभूत सुविधांचीही काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत भारताचा दिग्गज माजी कर्णधार राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी व्यक्त केले आहे.

“गुलाबी चेंडूने कसोटी सामना खेळणे ही चाहत्यांना क्रिकेट स्टेडियममध्ये परत येण्यास प्रवृत्त करण्याची एक सकारात्मक सुरुवात आहे,” असे इकाॅनाॅमिक्स टाईम्सला राहुल द्रविडने सांगितले.

“कार पार्किंग, बसण्याची सुविधा, शौचालय यासारख्या मूलभूत गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. या अशा काही गोष्टी आहेत ज्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात चाहत्यांना आकर्षित करतील,” असे द्रविड म्हणाला.

“ही अशा अनेक गोष्टींपैकी एक आहे जी चाहत्यांमध्ये कसोटी सामन्याबद्दल खरोखर उत्साह वाढवू शकते. जर आपण दव नियंत्रित करू शकलो तर गुलाबी चेंडू कसोटी क्रिकेटमध्ये भारतात वैशिष्ट्य ठरू शकते,” असेही द्रविड यावेळी म्हणाला.

गुलाबी चेंडू आणि दिवस-रात्र कसोटी क्रिकेटहे भारतात कसोटी क्रिकेटला जिवंत ठेवण्याचा एक मार्ग आहे. सध्या चाहत्यांचा कल मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यांकडे जास्त आहे. त्यामुळे कसोटी प्रकारासमोर एक मोठे संकट उभे राहिले आहे.

“जेव्हा चेंडू ओला होतो आणि स्विंग होत नाही तेव्हा गोलंदाजांसाठी हे खूप कठीण असते. गुलाबी चेंडू  ही एक नवीन गोष्ट आहे जी लोकांना स्टेडियमकडे आकर्षित करेल. त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत,” असेही द्रविडने सांगितले आहे.

“2001 साली ईडन गार्डनमध्ये 100000 लोक होते. परंतु कुणाकडे तेव्हा हा सामना पहायला घरात एचडी प्रकारातील टीव्ही नव्हते. तसेच त्यावेळी मोबाईलवर कुणी क्रिकेट पाहत नव्हते,” असेही जुन्या आठवणींना उजाळा देताना राहुल द्रविड म्हणाला.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---