माजी भारतीय कर्णधार आणि 2024 टी-20 विश्वचषक विजेते मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा मुलगा समित द्रविडला मोठा धक्का बसला आहे. दुखापतीमुळे समित द्रविड ऑस्ट्रेलियाविरुद्ध सोमवारपासून सुरू होणाऱ्या भारताच्या दोन अंडर-19 चार दिवसीय सामन्यांपासून दूर राहू शकतो. अलीकडेच भारतीय संघात निवडीबद्दल समित द्रविडची सध्या खूप चर्चा होत आहे.
समित द्रविड गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त असून तो सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) आहे. समित द्रविडचे पुद्दुचेरीतील भारतीय अंडर-19 संघात पदार्पण निश्चित वाटत होते. परंतु तो एकदिवसीय सामने खेळू शकला नाही. भारताने मालिका 3-0 ने जिंकली. मुख्य प्रशिक्षक ऋषिकेश कानिटकर यांनी ईएसपीएन क्रिकइन्फोला सांगितले की, ‘तो सध्या एनसीएमध्ये आहे आणि गुडघ्याच्या दुखापतीतून सावरत आहे. आत्ताच काही सांगू शकत नाही. पण चार दिवसीय सामन्यांच्या मालिकेत खेळणे अवघड आहे.
भारताचा माजी कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा मुलगा समितला अंडर-19 स्तरावर खेळण्याची ही शेवटची संधी आहे. तो 11 ऑक्टोबर रोजी 19 वर्षांचा होईल आणि 2026 चा आयसीसी अंडर-19 विश्वचषक खेळू शकणार नाही. दुसरा चार दिवसीय सामना 7 ऑक्टोबरपासून चेपॉक येथे खेळवला जाईल. उजव्या हाताने फलंदाजी करण्यासोबतच समित द्रविड मध्यमगती गोलंदाजीही करतो.
पुढील 19 वर्षाखालील विश्वचषक 2026 मध्ये झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये खेळवला जाईल. 2026 अंडर-19 वर्ल्ड कपपर्यंत समित द्रविडचे वय 20 वर्षांपेक्षा जास्त होईल. या कारणामुळे समित द्रविड 2026 अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये खेळू शकणार नाही. समित द्रविडचा जन्म 11 ऑक्टोबर 2005 रोजी झाला. समित द्रविड 11 ऑक्टोबर रोजी आपला 19 वा वाढदिवस साजरा करणार आहे.
हेही वाचा-
IND vs BAN: रवींद्र जडेजाची ऐतिहासिक कामगिरी; कानपूर कसोटीत विक्रमांची मालिका…
जसप्रीत बुमराहचा आणखी एक रेकॉर्ड, 2024 मध्ये अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच!
बांगलादेशच्या फलंदाजाची शतक ठोकूनही फजिती! नकोश्या लिस्टमध्ये मिळवलं स्थान