वेस्ट इंडिज संघाविरुद्ध पहिला सामना जिंकल्यानंतर भारतीय संघ आता दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे. गुरुवारपासून (दि. 20 जुलै) वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात त्रिनिदाद येथे दुसरा सामना खेळला जाईल. पहिल्या सामन्यात लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर यजमान संघ या सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. मागील काही वर्षापासून वेस्ट इंडीज संघाची आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी घसरली आहे. त्यावेळी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी वेस्ट इंडीज क्रिकेटला गतवैभव प्राप्त करून देणे विषयी विधान केले आहे.
दुसऱ्या कसोटी सामन्याआधी बोलताना द्रविड म्हणाले,
“मागील काही काळापासून आपण पाहत आहोत की वेस्ट इंडीज संघाची कामगिरी तितकी उत्कृष्ट झाली नाही. मात्र, घरच्या मैदानावर ते चांगले खेळतायेत. मालिका आधी त्यांनी मागील दोन वर्षात केवळ एकच कसोटी मालिका घरच्या मैदानावर गमावली आहे. या संघाची तुलना जुन्या वेस्ट इंडीज संघाशी करणे तितके योग्य नाही. आता खेळाडूंवर अधिक दबाव असतो.”
वेस्ट इंडीज संघ कशा रीतीने पुन्हा एकदा आपले वैभव प्राप्त करेल याबाबत बोलताना ते म्हणाले,
“हा संघ पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण करू शकतो. संघात अजूनही अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत. केवळ योग्य मार्गदर्शन व संसाधनांचा योग्य वापर केल्यास ते पुन्हा क्रिकेटच्या मुख्य प्रवाहात शीर्षस्थानी दिसू शकतात.”
वेस्ट इंडीज संघ मागील वर्षी झालेल्या टी20 विश्वचषकाच्या मुख्य फेरीसाठी पात्र ठरू शकला नव्हता. त्यानंतर आता भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकासाठी देखील हा संघ पात्र होण्यात यशस्वी ठरला नाही. भारताविरुद्ध कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीत देखील त्यांनी अवघ्या तीनच दिवसात नांगी टाकली होती
(Rahul Dravid Talk On West Indies Cricket Old Days Back If They Use Resources Right)
महत्त्वाच्या बातम्या-
श्रीलंकेत जाऊन पाकिस्तानने जिंकली पहिली कसोटी, भारत-इंग्लंडच्या विक्रमाला तडा
शाहरुख बनला विश्वचषकाचा ब्रँड एंबॅसेडर! व्हायरल फोटोनंतर आयसीसीने शेअर केला खास व्हिडिओ