भारतीय संघ गुरुवारी (10 नोव्हेंबर) टी-20 विश्वचषक 2022 मधून बाहेर पडला. इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या उपांत्य सामन्यात भारताला तब्बल 10 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. पराभवानंतर करोडो भारतीय चाहत्यांची निराशा झाली. सोबतच संघातील खेळाडू देखील चांगलेच दुःखी दिसले. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड हे पत्रकारांना सामोरे गेले. या सामन्यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये मोठे बदल करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.
तिसऱ्यांदा या स्पर्धेची अंतिम फेरी खेळण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने या सामन्यात खराब सुरुवात केली. मात्र, विराट कोहली व हार्दिक पंड्या यांनी शानदार अर्धशतके करत भारतीय संघाला निर्धारित 20 षटकात 168 पर्यंत मजल मारून दिली. या धावांचा पाठलाग करताना जोस बटलर व ऍलेक्स हेल्स यांनी भारतीय गोलंदाजांना कोणतीही संधी न देता केवळ 16 षटकात एकही गडी बाद न होऊ देता या धावा गाठून दिल्या. यासह इंग्लंडने उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यामुळे मागील 9 वर्षापासून भारतीय संघाचा सुरू असलेला आयसीसी विजेतेपदाचा दुष्काळ कायम राहिला.
या सामन्यानंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हे पत्रकारांना सामोरे गेले. भारतीय क्रिकेटमध्ये काय बदल करावे लागणार असे विचारले असता ते म्हणाले,
“सध्या भारतीय क्रिकेट प्रणाली जगात सर्वोत्तम आहे. मात्र, कुठेतरी आता भारतीय खेळाडूंना विदेशातील लीगमध्ये खेळण्याची परवानगी देण्याची वेळ आलीये. ही परवानगी मिळाल्यास भारतीय खेळाडूंना याचा नक्की लाभ होईल. मात्र, याबाबतचा निर्णय सर्वस्वी बीसीसीआय घेईल.”
सध्या भारतीय खेळाडूंना कोणत्याही विदेशातील टी20 लीग मध्ये खेळण्याची परवानगी नाही. खेळाडूंना विदेशातील लीगमध्ये खेळायचे असल्यास थेट निवृत्ती घ्यावी लागते. दुसरीकडे इतर सर्व देशातील क्रिकेटपटू विविध देशांमध्ये जाऊन व्यावसायिक क्रिकेट लीग खेळताना दिसतात. (Rahul Dravid Wants To Indian Players Play Foreign T20 League)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! भारतात क्रिकेटचा पाया रचणारा दिग्गज हरपला, चाहते दु:खात
युवराज सिंगच्या मोठ्या विक्रमाला धक्का! खास यादीत हार्दिक पंड्या पोहोचला पहिल्या क्रमांकावर