---Advertisement---

“राहुल द्रविड टीम इंडियात आणेल स्थैर्य”, दिग्गज भारतीय क्रिकेटरला विश्वास

On: गुरूवार, नोव्हेंबर 25, 2021 1:37 PM
Rahul Dravid
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचे नवनियुक्त प्रशिक्षक राहुल द्रविड हे अजूनही भरवशाचे दुसरे नाव आहे. द्रविड जेव्हा एक खेळाडू म्हणून खेळत असे, तेव्हा प्रत्येक संकटातून बाहेर पडण्यासाठी भारतीय चाहते आणि संघाचा त्याच्यावर विश्वास होता. आता द्रविड प्रशिक्षक असल्याने संघात स्थैर्य येईल, असा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंगला विश्वास आहे.

हरभजन सिंग म्हणाला की, विराट कोहली आणि रोहित शर्मासह द्रविड भारतीय क्रिकेटला खूप पुढे घेऊन जाईल. द्रविडचा कार्यकाळ सुरू झाला आहे. द्रविडने न्यूझीलंडविरुद्ध टी२० मालिका जिंकून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आहे, परंतु विश्व कसोटी चॅम्पियनशीप जिंकणे हे आव्हान असेल.

41 वर्षीय हरभजन क्रिकेट ब्रॉडकास्टर चॅनल स्टार स्पोर्ट्सच्या शोमध्ये चर्चा करत होता. यादरम्यान तो म्हणाला, नवीन कॉम्बिनेशन बनवण्यात काय फरक पडतो, ते पाहा. राहुल द्रविड जेव्हा नवीन प्रक्रियेनुसार संघात येईल, तेव्हा विराट कोहली, रोहित शर्मासह तो संघाला स्थिरता देईल याची मला खात्री आहे. मला वाटते त्यांनी एकत्र काम करून भारतीय क्रिकेटला नव्या उंचीवर नेले पाहिजे.

हरभजन म्हणालेा, द्रविड संघात स्थैर्य आणण्यासाठी खेळाडूंना चांगली संधी देईल आणि  कोणतीही अन्यायकारक वागणूक दिली जाणार नाही.

गुरुवारपासून भारतीय क्रिकेट संघ द्रविडच्या प्रशिक्षणाखाली न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मोहिमेला सुरुवात करत आहे. नियमित कर्णधार विराट कोहली पहिल्या कसोटीत उपलब्ध असणार नाही. त्याच्याऐवजी अजिंक्य रहाणे भारताच्या संघाचे नेतृत्त्व करेल.

कोहलीला टी२० विश्वचषकानंतर विश्रांती दिली आहे. तो न्यूझीलंडविरुद्ध मुंबई येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यातून भारतीय संघात पुनरागमन करेल.

महत्त्वाच्या बातम्या – 

पाकिस्तानचे विश्वविजेते कर्णधार इम्रान खान यांना युएईमध्ये जाहीर झाला मोठा क्रीडा पुरस्कार

श्रेयस अय्यर आधी कसोटी पदार्पण केलेेले ५ खेळाडू सध्या करतायेत तरी काय?

Video: गावसकरांच्या हस्ते पदार्पणाची कॅप मिळताच अय्यर भावूक, अशी राहिलीये मुंबईकर फलंदाजाची प्रथम श्रेणी कामगिरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---