---Advertisement---

Video: गावसकरांच्या हस्ते पदार्पणाची कॅप मिळताच अय्यर भावूक, अशी राहिलीये मुंबईकर फलंदाजाची प्रथम श्रेणी कामगिरी

On: गुरूवार, नोव्हेंबर 25, 2021 11:34 AM
---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते की, त्याने कसोटी क्रिकेटमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करावे. अनेकांचे हे स्वप्नं पूर्ण होत, तर अनेकांचे हे स्वप्नं अपूर्ण राहून जाते. अशातच वनडे आणि टी२० क्रिकेटमध्ये आपला जलवा दाखवल्यानंतर मुंबईकर श्रेयस अय्यर आता कसोटी क्रिकेटमध्ये देखील आपला जलवा दाखवण्यास सज्ज झाला आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात त्याला अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे.

कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना गुरुवापासून (२५ नोव्हेंबर) सुरू झाला. हा सामना सुरू होण्यापूर्वी श्रेयस अय्यरला कसोटी पदार्पणाची कॅप देण्यात आली. ही कॅप त्याला कसोटी दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांच्या हस्ते देण्यात आली. त्याला ३०३ क्रमांकाची कसोटी कॅप मिळाली आहे.

ही कॅप मिळवताच श्रेयस अय्यर भावूक झाला होता. यावेळी सुनील गावसकरांनी त्याला मार्गदर्शन केल्याचेही दिसले. ते ऐकून श्रेयस अय्यरला खूप प्रेरणा मिळत होती. पुढच्याच क्षणी त्याने कॅप हातात घेतली, थोडावेळ पाहिले आणि त्यानंतर कॅपचे चुंबन घेतले. त्यानंतर त्याला संघातील अन्य खेळाडूंनी शुभेच्छा दिल्या.

ऑस्ट्रेलियामध्ये ठोकले होते दुहेरी शतक
अनेकांना ही गोष्ट माहीत नसेल की, श्रेयस अय्यरने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दुहेरी शतक झळकावले आहे. २०१७ मध्ये त्याला भारतीय अ संघात स्थान देण्यात आले होते. यादरम्यान ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याला संधी देण्यात आली होती. या संधीचे सोने करत त्याने २०२ धावांची तुफानी खेळी केली होती.

श्रेयस अय्यरच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधील कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने ५४ सामन्यात १०८ षटकारांचा मदतीने ४५९२ धावा केल्या आहेत. यामध्ये १२ शतक आणि २३ अर्धशतकांचा समावेश आहे.

https://twitter.com/BCCI/status/1463709356713644037?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1463709356713644037%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fd-39063482772835913766.ampproject.net%2F2111060251009%2Fframe.html

असे आहेत ११ जणांचे संघ – 
भारत – शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (कर्णधार), श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, उमेश यादव

न्यूझीलंड – टॉम लॅथम, विल यंग, ​​केन विलियम्सन (कर्णधार), रॉस टेलर, हेन्री निकोल्स, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), रचिन रवींद्र, टिम साउथी, एजाज पटेल, काइल जेमिसन, विल्यम सोमरविल

महत्त्वाच्या बातम्या – 

“भारतीय संघाला मायदेशात न्यूझीलंडचा एकच फलंदाज अडचणीत टाकू शकतो”

दर्जेदार! भारतात खेळताना न्यूझीलंडच्या फलंदाजांनी केलेली सर्वोत्तम ५ खेळी

दुर्दैवच अजून काय! रणजी ट्रॉफीचे ३ दिग्गज कर्णधार, ज्यांना मिळाली नाही टीम इंडियाकडून खेळण्याची संधी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---