वनडे विश्वचषक 2023 जिंकण्याचे स्वप्न भारतीय संघ पूर्ण करू शकला नाही. रविवारी (19 नोव्हेंबर) अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर 6 विकेट्स राखून विजय मिळवला. विश्वचषकाच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा ही ट्रॉफी उंचावली. वनडे विश्वचषकातील पराभवानंतर भारताचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याच्याबर बीसीसीआय काय ऍक्शन घेणार, याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.
वनडे विश्वचषक 2023 (WC 2023) गमावल्यानंतर राहुल द्रविड आणि बीसीसीआय यांचे मार्ग वेगळे होणार आहेत. 2021 विश्वचषकात भारतीय संघ पराभूत झाल्यानंतर रवी शास्त्री यांचा संघासोबत मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ संपला. त्यानंतर राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्या रुपात भारताला नवा मुख्य प्रशिक्षक मिळाला. द्रविडच्या मार्गदर्शनात भारतीय संघ विश्वचषक जिंकेल, अशी सर्वांना आशा होती. पण रविवारी (19 नोव्हेंबर) या आशा मावळल्या. वनडे विश्वचषक संपल्यानंतर द्रविडचा मुख्य प्रशिक्षक म्हणून बीसीसीआयसोबत असणारा करार देखील संपला आहे. अशात बीसीसीआय द्रविडला हे पद सोडायला लावणार की, पुन्हा या पदावर त्याची नियुक्ती करणार, हे पाहावे लागणार आहे.
दरम्यान, राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनात भारताने हा पहिला विश्चचषक गमावला, असे नाहीये. याआधी दोन आयसीसी ट्रॉफी द्रविड संघाला जिकंवून देऊ शकला नाहीये. 2022 साली झालेला टी-20 विश्वचषक आणि यावर्षी झालेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताला पराभव मिळाला होता. या दोन्ही पराभवांचे ओझेही द्रविडच्याच माध्यावर आहे. असे असले तरी, वनडे विश्वचषकात भारताचे एकंदरीत प्रदर्शन अप्रतिम राहिले. अंतिम सामन्यात संघ पराभूत झाला. पण त्याआधीचे सर्वच्या सर्व 10 सामने भारताने मोठ्या फरकाने जिंकले होते. अशात बीसीसीआयसाठी द्रविडकडून मुख्य प्रशिक्षकपद काढून घेणे सोपा निर्णय नसेल.
भारतीय संघाला विश्वचषक संपल्यानंतर 23 नोव्हेंबर पासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. यासाठी भारताचा युवा संघ मैदानात उतरणार असून मुख्य प्रशिक्षपद एनसीएचे प्रमुख वीवीएस लक्ष्मण यांच्या हातात असेल, अशा बातम्या माध्यमांंमध्ये आहेत. (Rahul Dravid will step down as head coach after the ODI World Cup defeat)
महत्वाच्या बातम्या –
CWC2023Final । पराभवानंतरही विराटच ठरला मालिकावीर! जाणून घ्या संपूर्ण हंगामातील प्रदर्शन
‘क्रिकेट माफियांविरुद्ध न्यायाचा विजय, तुमचा पैसा आणि पॉवर…’, पराभवानंतर पाँटिंगने काढली BCCIची ‘लाज’