तब्बल 140 कोटी भारतीय क्रिकेटप्रेमींना विश्वचषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताच्या विजयाची आशा होती. मात्र, त्या सर्व आशांवर ऑस्ट्रेलियाने पाणी फेरले. ऑस्ट्रेलियाने भारताला 6 विकेट्सने पराभवाचा धक्का दिला. तसेच, सहाव्यांदा विश्वचषकाचा किताब नावावर केला. भारतीय संघाच्या पराभवानंतर चाहत्यांसोबतच भारतीय कलाकारही निराश दिसले. रविवारी (दि. 19 नोव्हेंबर) अंतिम सामना पाहण्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे पोहोचलेल्या अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि अथिया शेट्टी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये त्या निराश झाल्याचे दिसत आहे.
अनुष्का शर्मा आणि अथिया शेट्टीची रिऍक्शन
भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि केएल राहुल (KL Rahul) याची पत्नी अथिया शेट्टी (Athiya Shetty) नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये (Narendra Modi Stadium) हजर होत्या. दोघींनी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (INDvsAUS) संघातील विश्वचषक 2023 अंतिम सामन्याचा (World Cup 2023 Final) आनंद लुटण्यासाठी आणि भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी मैदानात हजेरी लावली होती. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभावचा सामना करावा लागला. यानंतर अनुष्का शर्मा आणि अथिया शेट्टी (Anushka Sharma And Athiya Shetty) खूपच उदास झाल्या. आता दोघींचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
Even Anushka and Athiya been knew💔💔 I’m just speechless 😭😭#INDvsAUS pic.twitter.com/5AR15e4dtv
— PRINCESS✨ (@PriyankaAnomaly) November 19, 2023
Anushka Sharma hugging Virat Kohli after the loss in the final. [Sportstar]
– This is painful. pic.twitter.com/dUYo7oAZAF
— Johns. (@CricCrazyJohns) November 19, 2023
POST POWERPLAY-
KL Rahul- 66/1 in 17.5 overs
Rest of India(+extras) – 94/7 in 22.1 overs
People who are blaming Rahul, have some shame, u literally have 0 knowledge about cricket,u are a blind hater who is just hiding the failure of his own favourite player #INDvsAUS #KLRahul pic.twitter.com/eh4Qb6ja5Y
— 𝙎𝙤𝙣𝙪 ✨ (@KLfied_) November 19, 2023
विराट-राहुलही भावूक
भारतीय संघाच्या पराभवामुळे फक्त चाहते आणि कलाकारच नाही, तर खेळाडू विराट कोहली आणि केएल राहुल (Virat Kohli And KL Rahul) यांनाही दु:ख झाले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्याही अश्रूंचा बांध तुटला. त्याने संपूर्ण स्पर्धेत शानदार प्रदर्शन करत भारताला अंतिम सामन्यात पोहोचवण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. मात्र, अंतिम सामन्यात भारतीय फलंदाजांनी निराश केले.
प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 50 षटकात 10 विकेट्स गमावत फक्त 240 धावा केल्या होत्या. यामध्ये राहुलच्या सर्वाधिक 66 धावांचे योगदान होते. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 43 षटकात 6 विकेट्स राखून पार केले. ऑस्ट्रेलियाकडून ट्रेविस हेड (Travis Head) याने शतक ठोकले. त्याने 120 चेंडूत 137 धावांची शतकी खेळी केली. त्यात 4 षटकार आणि 15 चौकारांचा समावेश होता. (world cup 2023 india vs australia Final virat kohli kl rahul anushka sharma athiya shetty sad reaction)
हेही वाचा-
धक्कादायक! दारुण पराभवासाठी गावसकरांनी ‘या’ दोघांना धरलं जबाबदार; सांगूनच टाकलं, नेमकी कुठं झाली चूक
‘रोहित जगातील सर्वात दुर्दैवी माणूस…’, भारताकडून वर्ल्डकप हिसकावताच शतकवीर हेडचे ‘हिटमॅन’विषयी मोठे भाष्य