वनडे विश्वचषक 2023 ऐन दिवाळीमध्ये खेळला गेला. दिवाळीसाठी मिळालेल्या सुट्ट्या बहुतांश चाहत्यांनी विश्वचषकाचे सामने पाहण्यात घालवल्या. रविवारी (19 नोव्हेंबर) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी एक अशी बातमी समोर येत आहे, ज्यामधून भारतीयांचे क्रिकेटप्रेम स्पष्टपणे दिसून येते.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा विश्वचषकाचा अंतिम सामना अहमदाबादमध्ये आयोजित केला गेला आहे. जगातील सर्वात मोठे नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम या सामन्यासाठी सज्ज आहे. 1,30,000 पेक्षा अधिक चाहते अंतिम सामन्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हजेली लावणार आहेत. तसेच कोट्यावधी चाहते मोबाईल आणि टीव्हीवर हा सामना पाहतील. असे असले तरी, सोमवारी (19 नोव्हेंबर) म्हणजेच अंतिम सामन्याच्या दुसऱ्या दिवशी प्रत्येकाला आपल्या ठरलेल्या कामावर जायचे आहे. शाळकरी विद्यार्थी आणि कॉलेजमध्ये जाणाऱ्या तरुणांना देखील सोमवारी ठरलेले वेळापत्रक आहेत.
असे असले तरी, हरियाणाच्या फरिदावादमध्ये एक शाळा अशी आहे, ज्यांनी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यामुळे मोठा निर्णय घेतला आहे. होय, विश्वचषकाचा अंतिम सामना झाल्यानंतर सोमवारी म्हणजेच 20 नोव्हेंबर रोजी फरिदाबादच्या डी.ए.व्ही. पब्लिक स्कुलमध्ये 6वी आणि 7वी इयत्तेची चाचणी परिक्षा रद्द केली गेली. मुध्याध्यापकांच्या सहमतीने ही परिक्षा सोमवारी ऐवजी मंगळवारी (22 नोव्हेंबर) आयोजित केली गेली आहे. तसेच यासाठी काठण्यात आलेल्या नोटिस पत्रात भारतीय संघाला विश्वचषक जिंकण्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या गेल्या आहेत. सोशल मीडियावर सध्या हे नोटिस पत्र तुफान व्हायरल होत आहे.
A school in Faridabad postponed Unit Test due to World Cup Final. pic.twitter.com/IZ0jY6MSPw
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 19, 2023
दरम्यान, वनडे विश्वचषक 2023 हंगामात भारताचे आव्हान अंतिम सामन्यापर्यंत अबाधित राहिले आहे. हंगामताली सुरुवातीच्या 10 पैकी 10 सामने भारताने जिंकले आहेत. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने 10 पैकी 8 सामने नावावर केले आहेत. सुरुवातीच्या दोन सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभव मिळाला होता. पण नंतरच्या सलग 8 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियन संघाने बाजी मारली. (IND vs AUS School exams canceled due to World Cup finals)
महत्वाच्या बातम्या –
चॅम्पियन भारतच! World Cup Final साठी विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियन्सचीही टीम इंडियाला पसंती
CWC2023 । दुखापतीमुळे वर्ल्डकपबाहेर गेलेला पंड्याचा टीम इंडियाला खास संदेश, फायनलआधी म्हणाला, ‘भावांनो…’