---Advertisement---

‘प्रशिक्षक’ राहुल द्रविड मिळवून देऊ शकतो ‘विश्वचषक’, पण पार करावी लागतील ‘ही’ पाच आव्हाने

On: गुरूवार, नोव्हेंबर 4, 2021 8:26 PM
---Advertisement---

माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडला भारतीय संघाचा नवा प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. २०२१ च्या टी२० विश्वचषकानंतर तो प्रशिक्षक पदाचा पदभार स्वीकारणार आहे. १७ नोव्हेंबरपासून न्यूझीलंडविरुद्ध मालिकेला सुरुवात करण्याचे आव्हान त्याच्यासमोर आहे. सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेनंतर संपत आहे. त्यांच्या कार्यकाळात संघाने परदेशात विजय मिळवला, पण संघाला एकही आयसीसी चषक जिंकता आलेला नाही.

त्यांच्या कार्यकाळात आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात संघाचा पराभव झाला. भारतीय संघाला पुढील २ वर्षात तीन आयसीसी चषक जिंकण्याची संधी आहे. यामध्ये २०२२ मध्ये होणारा टी२० विश्वचषक आणि २०२३ मध्ये एकदिवसीय विश्वचषक आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा समावेश आहे. प्रशिक्षक राहुल द्रविडसमोर ही ५ मोठी आव्हाने असतील, ज्यांवर त्याला मात करावी लागणार आहे.

१. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतून रोहित शर्माला संघाचा नवा कर्णधार बनवले जाऊ शकते. त्याला वनडे संघाची कमानही दिली जाऊ शकते. अशा परिस्थितीत विराट कोहलीची संघात भूमिका काय असेल? कर्णधार असताना खेळाडूंना विश्वासात न घेतल्याची बाब समोर आली. त्यामुळे तो संघात वारंवार बदल करत असे. सध्याच्या टी२० विश्वचषकातील पहिल्या ३ सामन्यांमध्येही हे दिसून आले. अशा परिस्थितीत द्रविडला त्यात बदल करावे लागतील, जेणेकरून खेळाडूला अस्वस्थता वाटणार नाही.

२. भारतीय संघाचे वरिष्ठ खेळाडू ६ महिन्यांपासून बायो बबलमध्ये आहेत. अशा स्थितीत न्यूझीलंड मालिकेत युवा खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते. पण वरिष्ठ खेळाडूंना २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत खेळावे लागेल, कारण ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग आहे. अशा स्थितीत कामाचा ताण सांभाळणे सोपे राहणार नाही. याशिवाय अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, इशांत शर्मा या ज्येष्ठ खेळाडूंचाही कसोटीत पर्याय शोधावा लागणार आहे. हे खेळाडू वयाच्या आणि कारकिर्दीच्या उतारावर आहेत.

३. डिसेंबर-जानेवारीमध्ये हा संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. तीन सामन्यांची कसोटी मालिकाही होणार आहे. त्यानंतर फेब्रुवारी-मार्चमध्ये संघाला श्रीलंकेविरुद्ध खेळायचे आहे. यानंतर एप्रिलपासून आयपीएल स्पर्धा तर नोव्हेंबरमध्ये टी-२० विश्वचषक होणार आहे. अशा परिस्थितीत खेळाडूंना शारीरिक दृष्ट्या तयार करण्याची गरज भासणार आहे, जेणेकरून खेळाडूंना थकव्यापासून वाचवता येईल. २०२३ मध्ये एकदिवसीय विश्वचषकही होणार आहे.

४. मर्यादित षटकांसाठी आणि कसोटीसाठी वेगवेगळे कर्णधार केले जाऊ शकतात. प्रत्येक कर्णधाराची स्वतःची रणनीती आणि भूमिका असते. आतापर्यंत तिन्ही प्रकारामध्ये कर्णधारपद विराट कोहली सांभाळत होता. अशा परिस्थितीत द्रविडला एका वेळी दोन वेगवेगळ्या कर्णधारांशी जुळवून घ्यावे लागेल.

५. राहुल द्रविडला वर्षभरात टी-२० विश्वचषकासाठी संघ तयार करायचा आहे. अशा परिस्थितीत त्याच्यासाठी गोष्टी सोप्या नसणार आहेर. संघ हरतो आणि जिंकतो तेव्हा प्रशिक्षकावर नेहमीच टिप्पणी केली जाते. याशिवाय विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुलसारख्या वरिष्ठ खेळाडूंची भूमिकाही त्यालाच ठरवावी लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘विराट कोहलीला आमच्या ड्रेसिंग रुममध्ये बघायला आवडेल’, स्कॉटलंडच्या कर्णधाराने व्यक्त केली इच्छा

राहुल द्रविड- नम्रतेचा महामेरू बहुत जनांसी आधारु

धारदार यॉर्करसह स्टार्कने बनविला विश्वविक्रम; ‘अशी’ कामगिरी करणारा बनला पहिला गोलंदाज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---