भारतीय क्रिकेट संघाचे माजी दिग्गज आणि सध्या संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका पार पाडणारे राहुल द्रविड यांनी खास प्रतिक्रिया दिली आहे. द्रविड पाकिस्तानविरुद्ध रविवारी (4 सप्टेंबर) खेळल्या जाणाऱ्या सुपर फोरमधील सामन्यापूर्वी माध्यमांशी बोलत होते. आशिया चषक 2022 मधील हा भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये खेळला जाणारा दुसरा सामना आहे. उभय संघातील पहिल्या सामन्याविषयी बोलताना द्रविडने पाकिस्तानी गोलंदाजांची फिरकी घेतल्याचे पाहायला मिळाले.
पाकिस्तानविरुद्ध आशिया चषकातील पहिल्या सामन्यात भारतीय संघ 5 विकेट्स राखून विजय मिळवला होता. भारतीय संघाने या सामन्यात चांगले प्रदर्शन केले, पण पाकिस्तानी संघाचे (Pakistan Cricket Team) प्रदर्शन देखील पाहण्यासारखेच होते. तसे पाहिले तर, पाकिस्तानी वेगवान गोलंदाज नेहमीच त्यांच्या चांगल्या प्रदर्शनासाठी कौतुकास पात्र ठरत असतात. परंतु सुपर फोरमधील लढतीपूर्वी भारतीय मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी पाकिस्तानी खेळाडूंंची अप्रत्यक्षपणे खिल्ली उडवली आहे.
सुपर फोरमध्ये पाकिस्तानसोबत खेळण्यापूर्वी राहुल द्रविड माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की, “त्यांनी चांगली गोलंदाजी नक्कीच केली, पण आमच्या फलंदाजांनी देखील त्यांच्याविरोधात खूप धावा केल्या. आमच्या खेळाडूंनी मोठ्या टूर्नामेंटमध्ये त्यांच्याविरोधात खूप धावा केल्या आहेत. नसीम शाह याने मागच्या सामन्यात खूप गोलंदाजी केली होती. पण आम्हाला वाटते की, आमच्याकडेही खूप गुणवंत फलंदाज आहेत, जे त्यांच्याविरुद्ध चांगले प्रदर्शन करू शकतात. आमचे खेळाडू त्यांच्यापेक्षा चांगले खेळू शकतात.”
“एखाद्या दिवसी पाकिस्तानचे खेळाडू चांगले प्रदर्शन करतील, तर एखाद्या दिवशी आमचे खेळाडू चमकदार कामगिरी करून दाखवतील. परंतु आम्ही स्वतःवर फोकर करतो पाकिस्तानवर नाही. आम्हाला वाटते की, खेळाडू जर तयार आणि चांगल्या फ्रेम ऑफ माइंड सेटमध्ये असतील, तर आम्ही पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, बांगलादेश कोणताही संघ असला, तर त्यांच्याविरोधात चांगले प्रदर्शन करू शकतो,” असे द्रविड पुढे बोलताना म्हणाले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानचा संघ ‘दुसऱ्या आफ्रिदी’च्या शोधात, भारताविरुद्धच्या लढतीपूर्वी रिझवानची लक्षवेधी प्रतिक्रिया
INDvsPAK: भारताला आणखी एक धक्का, खुद्द द्रविडने सांगितलेय; प्लेइंग इलेव्हनबद्दलही दिलेत संकेत
सूर्या आणि भारताच्या अन्य फलंदाजांना बाद करण्यासाठी पाकिस्तानने आखली स्ट्रॅटेजी, वाचा सविस्तर