शनिवारी (१७ ऑक्टोबर) दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या आयपीएलच्या तेराव्या हंगामातील ३३व्या सामन्यात पुन्हा एकदा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने राजस्थान रॉयल्सवर बाजी मारली. त्यांनी ७ विकेट्सने सामना खिशात घालत, राजस्थानविरुद्ध या हंगामातील दूसरा विजय नोंदवला. असे असले तरी, राजस्थानच्या राहुल तेवतियाने गजब अंदाजात बेंगलोरच्या कर्णधार विराट कोहलीला पव्हेलियनला पाठवलं.
राजस्थानच्या १७८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विराट १३४.३८च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत होता. त्याने १३व्या षटकापर्यंत १ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ४३ धावा केल्या होत्या. त्यामुळे डावातील १४वे षटक टाकण्यासाठी आलेल्या कार्तिक त्यागीच्या गोलंदाजीवरही जोरदार षटकार ठोकत अर्धशतक पूर्ण करावे असा विराटचा हेतू होता. म्हणून त्याने षटकातील पहिल्याच चेंडूला पूर्ण ताकदीने फटकारलं.
पण सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षणासाठी उभारलेल्या राहुल तेवतियाने विराटला झेलबाद केले. तेवतियाने सुरुवातीला पळत येत सीमारेषेच्या आत चेंडू झेलला. पण त्याला तोल सावरला नाही आणि तो सीमारेषेबाहेर गेला. पण पुन्हा मैदानात येत त्याने चेंडू पकडला.
Stunning tewatia pic.twitter.com/CSNedUnaQU
— Shahbaj Mansuri (@ShahbajMansuri4) October 17, 2020
Finally something fantasy created by lord Tewatia in IPL Fantasy League 🥳🔥😍 pic.twitter.com/OszH3fxNBQ
— Alone Walker (@aawara_engynar) October 17, 2020
https://twitter.com/realcrickpanda/status/1317451914821332992?s=20
Rahul Tewatia has had two match winning knocks with the bat.
This could be match winning catch!! .#RRvRCB https://t.co/POtYwYVM9V— N______Pandey (@nitesh___007) October 17, 2020
सोशल मिडियावर चाहते तेवतियाच्या या अप्रतिम झेलचे तोंडभरुन कौतुक करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘मिस्टर ३६०’ ठरला आरसीबीचा संकटमोचक, ७ विकेट्सने राजस्थानला लोळवलं
कटू सत्य! स्वत: राजस्थान संघच ठरतोय त्यांच्या स्टार खेळाडूंच्या फ्लॉप होण्यामागचं कारण
IPL 2020: मुंबई इंडियन्सच्या दिग्गजांकडून ‘अर्जुन’ घेतोय गोलंदाजीचे धडे
ट्रेंडिंग लेख-
आयपीएल २०२०: असे ३ खेळाडू, ज्यांनी एक खेळी संघासाठी नाही तर स्वतःसाठी खेळली
गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज ‘अनिल कुंबळे’
दुखापतग्रस्त असतानाही गोलंदाजी करण्याची जिद्द दाखवणाऱ्या कुंबळेचा आज वाढदिवस…