---Advertisement---

हैदराबादच्या पठ्ठ्यानं गाजवलं मैदान, अवघ्या २१ चेंडूत झळकावलं हंगामातलं दुसरं वेगवान अर्धशतक

On: शनिवार, एप्रिल 16, 2022 12:35 AM
Rahul-Tripathi
---Advertisement---

सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएल २०२२च्या २५व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध शानदार विजय मिळवला. हैदराबादच्या फलंदाजांनी विस्फोटक खेळी करत ७ विकेट्सने संघाला सामना जिंकून दिला. हा संघाचा या हंगामातील सलग तिसरा विजय होता. संघाला हा विजय मिळवून देताना धडाकेबाज फलंदाज राहुल त्रिपाठीने शानदार विक्रमही आपल्या नावावर केला. त्याने या हंगामात दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात वेगवान अर्धशतक साकारले.

या सामन्यात कोलकाता (Kolkata Knight Riders) संघाने दिलेल्या १७६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) आणि कर्णधार केन विलियम्सन (Kane Williamson) यांच्या लवकर विकेट्स पडल्या. अभिषेकने ३ धावा, तर विलियम्सनने १७ धावा केल्या. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या राहुल त्रिपाठीने (Rahul Tripathi) फलंदाजीतून पाऊस पाडला. त्याने अवघ्या २१ चेंडूत आपले अर्धशतक झळकावले. यासह तो हंगामात सर्वात वेगवान अर्धशतक करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पंजाब किंग्सच्या लियाम लिविंगस्टोनसह संयुक्तरीत्या दुसऱ्या क्रमांकावर विराजमान झाला.

या हंगामात सर्वात वेगवान अर्धशतक झळकावणारा फलंदाज कोलकाताचाच पॅट कमिन्स आहे. त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळताना अवघ्या १४ चेंडूत अर्धशतक केले होते. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर राजस्थान रॉयल्सचा जोस बटलर आहे. त्याने गुजरात टायटन्सविरुद्ध खेळताना २३ चेंडूत अर्धशतक मारले होते. तसेच, बटलरसह तिसऱ्या क्रमांकावर संयुक्तरीत्या एविन लुईस आहे. त्यानेही चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध खेळताना २३ चेंडूत अर्धशतक केले होते. यानंतर चौथ्या स्थानावर असलेल्या संजू सॅमसनने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध २५ चेंडूत अर्धशतक केले होते.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

राहुल त्रिपाठीची या हंगामातील कामगिरी
राहुल त्रिपाठीने या हंगामात आतापर्यंत ५ सामने खेळले आहेत. हे सामने खेळताना त्याने ५७च्या सरासरीने १७१ धावा केल्या. यामध्ये १ अर्धशतकाचा समावेश होता. विशेष म्हणजे, त्रिपाठीने या धावा १७८.१३च्या स्ट्राईक रेटने केल्या.

आयपीएल २०२२मध्ये वेगवान अर्धशतक करणारे खेळाडू
१४ चेंडू- पॅट कमिन्स (विरुद्ध मुंबई इंडियन्स)
२१ चेंडू- राहुल त्रिपाठी (विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स)*
२१ चेंडू- लियाम लिविंगस्टोन (विरुद्ध गुजरात टायटन्स)
२३ चेंडू- जोस बटलर (विरुद्ध गुजरात टायटन्स)
२३ चेंडू- एविन लुईस (विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स)
२५ चेंडू- संजू सॅमसन (विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद)

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

पुन्हा एकदा झाला हैदराबादचा ‘सनराईज’, कोलकाताला ७ विकेट्सने नमवत मिळवला सलग तिसरा विजय

अखेरच्या षटकात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या विस्फोटक फलंदाजांच्या यादीत पोहोचला रसेल; पाहा सिक्सर्सचा आकडा

कुठे एका संघासाठी आयुष्य पणाला लावणारे खेळाडू आणि कुठे ‘एवढ्या’ आयपीएल संघांकडून खेळलेला ऍरॉन फिंच

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---