---Advertisement---

प्रतिक्षा संपली! राहुल त्रिपाठी करणार भारतासाठी पदार्पण, ‘अशी’ आहे प्लेइंग इलेव्हन

Rahul tripathi
---Advertisement---

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-20 सामना एमसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. उभय संघांतील या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघासाठी फलंदाज राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) याने या सामन्यात टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. राहुल सध्या 31 वर्षांचा आहे. मागच्या मोठ्या तो भारतासाठी पदार्पणाची प्रतिक्षा करत होता. अखेर श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्याला देशासाठी खेळण्याची संधी मिळाली.

https://twitter.com/BCCI/status/1610981630163943424?s=20&t=WbAp5Z4GxNzLXI7PNGcfgA

भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) या मालिकेतून दुखापतीमुळे खेळत नाहीये. रोहितच्या अनुपस्थितीत हार्दिक पंड्या संघाचे नेतृत्व करत आहे. हार्दिक मालिकेतील पहिला टी-20 सामना जिंकला असून दुसऱ्या सामन्यात देखील तो संघाला विजय मिळवून देण्याच्या प्रयत्नात असेल. तसेच मागच्या सामन्यात भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन (Sanju Samson) दुखापतग्रस्त झाला होता. या दुखापतीनंतर सॅसमनने मालिकेतून पुढच्या दोन्ही सामन्यांमधून माघार घेतली. मालिकेती हा दुसरा सामना निर्णायक ठरेल. भारताने जर यात विजय मिळवला, तर मालिका देखील संघाच्या नावावर होती. तसेच श्रीलंकन संघाने विजय मिळवाल, तर मालिका एक-एक विजय मिळवला.

https://twitter.com/BCCI/status/1610985172354367490?s=20&t=WbAp5Z4GxNzLXI7PNGcfgA

दुसऱ्या टी-20 सामन्यातील प्लेइंग इलेव्हन –
भारत – हार्दिक पांड्या (कर्णधार), ईशान किशन (यष्टीरक्षक) शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, अक्षर पटेल, शिवम मावी, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, युझवेंद्र चहल.

श्रीलंका – दासुन शनाका (कर्णधार), पाठुम निस्संका, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), धनंजय डी सिल्वा, भानुका राजपक्षे, चारिथ असलंका, वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, महेश थिक्षाना, कसून रजिथा, दिलशान मधुशंका. (Rahul Tripathi will make his debut for India, see the playing XI for the second T20I)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एकीकडे शिवम मावीने गाजवलं मुंबाईचं वानखडे स्टेडियम अन् दुसरीकडे घरी कुटुंबीय…
टीम इंडियाच्या ‘या’ दोन दिग्गजांना आयडल मानतो जितेश; म्हणाला, “त्यांनी मला…” 

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---