---Advertisement---

MPL 2025: रायगड राॅयल्स संघाचे एमपीएलचे संपुर्ण स्क्वॅाड! पहा एका क्लिकवर

On: शुक्रवार, मे 23, 2025 7:52 AM
---Advertisement---

महाराष्ट्र प्रीमियर लीग (MPL) 2025 चा बिगुल वाजला असून, सगळ्या संघांनी विजेतेपदासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. देशभरात लोकप्रिय असलेल्या या एमपीएलचे हे यंदाचे तिसरे हंगाम आहे. यंदाच्या हंगामाला 4 जून पासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेपूर्वी सर्व संघांनी सरावाला सुरुवात केली आहे. (MPL 2025: Maharashtra Premier League to Begin from 4th June)

या हंगामात रायगड रॉयल्सही मैदानावर धमाका करण्यासाठी सज्ज आहेत. रायगड रॉयल्सने अनुभवी खेळाडू आणि तेजस्वी तरुणांचा जबरदस्त संगम करून आपली ताकद अधिक बळकट केली आहे. संघाची कमान विक्की ओत्सवालकडे आहे.

एमपीएल 2025 साठी रायगड रॉयल्सचा संपूर्ण संघ- विक्की ओत्सवाल (कर्णधार), सव्या गज्राज, निखिल कदम, नदीम शेख, निमीर जोशी, शुभम कदम, अथर्व चौधरी, मोहम्मद अरकाम, ईशान लोहिया, श्रावण खाडे, ओमकार राजपूत, सिद्धेश वीर, तनय संघवी, रविनोरा जाधव, निरज जोशी, सागर जाधव, अभिषेक श्रीवास्तव, हितेश वालुंज, चेतन कुरांदळे, नीरज मोरे, स्नेहल कामणकर, ऋषभ राठोड, वैभव अगम, अजय बोरुडे, दिग्विजय पाटील, स्वप्नील फुलपगार, ओमकार खाटपे, हर्ष संघवी, ऋग्वेद मोरे, हर्ष मोगवेऱ्या, रणवीर एस. चौहान, उत्कर्ष हजारे, रजनीकांत पडवळ, इब्राहिम वेलास्कर, हर्ष ओसवाल, अभिषेक ताटे, शर्विन किसवे, नचिकेत ठाकूर, ओमकार मोहिते, हृषीकेश राऊत

स्पर्धेतील सर्व सामने पुण्यातील एमसीए इंटरनॅशनल स्टेडियम, गहुंजे येथे खेळविण्यात येणार आहेत. शिवाय स्पर्धेतील सर्व सामन्यांसाठी प्रेक्षकांना मोफत प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी दिली आहे.

या निर्णयामुळे क्रिकेटप्रेमींना कोणतेही शुल्क न देता थेट स्टेडियममध्ये सामन्यांचा आनंद घेता येणार आहे. “क्रिकेट खेळावं आणि पाहावं हीच भावना घेऊन हा निर्णय घेतला असून, जास्तीत जास्त प्रेक्षकांनी मैदानात उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावं,” असे आवाहनही रोहित पवार यांनी केले आहे. (Free Entry For All MPL/WMPL Matches)

दरम्यान, जे प्रेक्षक मैदानात उपस्थित राहू शकणार नाहीत, त्यांच्यासाठी सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण ‘JioHotstar’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तसेच ‘Star Sports 2’ या टीव्ही वाहिनीवर करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रेक्षक मोबाईल, टीव्ही किंवा लॅपटॉपच्या माध्यमातून घरबसल्या सामने पाहू शकणार आहेत. (Where to Watch MPL 2025: Live on Star Sports 2 and JioHotstar)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---