भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील तिसरा टी20 सामना मंगळवारी (दि. 22 नोव्हेंबर) मॅकलीन पार्क, नेपियर येथे पार पडला. या सामन्याला विजेता मिळाला नाही. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना डकवर्थ लुईस नियमानुसार बरोबरीत सुटला. यावेळी सुपर ओव्हर न खेळवताच सामना बरोबरीत सुटला. या सामन्यात केलेल्या अविस्मरणीय गोलंदाजीसाठी मोहम्मद सिराज याला सामनावीर घोषित करण्यात आले. या मालिकेत केलेल्या शानदार कामगिरीसाठी भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव याला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
न्यूझीलंड संघाने तिसऱ्या टी20 सामन्यात नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी न्यूझीलंडने फलंदाजी करताना सर्वच्या सर्व 10 विकेट्स गमावत 160 धावा चोपल्या. तसेच, भारताला 161 धावांचे आव्हान दिले होते. मात्र, यावेळी भारतीय संघ 9 षटकाअखेर 4 विकेट्स गमावत 75 धावाच करू शकला. पावसाच्या व्यत्ययामुळे पुढचा डाव खेळला गेला नाही.
Mohammed Siraj is adjudged Player of the Match for his brilliant bowling figures of 4/17 as the final T20I ends in a tie on DLS.
Scorecard – https://t.co/rUlivZ308H #NZvIND pic.twitter.com/kSHPp8wFTx
— BCCI (@BCCI) November 22, 2022
भारताकडून फलंदाजी करताना कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने सर्वाधिक धावा चोपल्या. त्याने 18 चेंडूत 30 धावा चोपल्या. यामध्ये 1 षटकार आणि 3 चौकारांचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त सूर्यकुमार यादवने 13, रिषभ पंतने 11, ईशान किशनने 10 आणि दीपक हुड्डाने 9 धावांचे योगदान दिले.
यावेळी न्यूझीलंडकडून गोलंदाजी करताना प्रभारी कर्णधार टीम साऊदी (Tim Southee) याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने 3 षटकात 27 धावा देत 2 विकेट्स चटकावल्या. त्याच्याव्यतिरिक्त ऍडम मिल्ने आणि ईश सोधी यांनी प्रत्येकी एक विकेट आपल्या नावावर केली.
न्यूझीलंडचा डाव
तत्पूर्वी न्यूझीलंडकडून प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर डेवॉन कॉनवे याने सर्वाधिक धावा चोपल्या. यावेळी त्याने 49 चेंडूत 59 धावा केल्या. या धावा करताना त्याने 2 षटकार आणि 5 चौकारांचीही बरसात केली. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 120.41 इतका होता. त्याच्याव्यतिरिक्त ग्लेन फिलिप्स यानेही 33 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 54 धावा चोपल्या. या दोघांव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मार्क चॅम्पमनने 12, डॅरिल मिचेलने 10 आणि मिचेल सँटनरने 1 धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडच्या 3 फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही.
यावेळी भारताकडून गोलंदाजी करताना दोनच गोलंदाज तुफान गाजले. यामध्ये अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज यांचा समावेश आहे. दोघांनीही प्रत्येकी 4 विकेट्स आपल्या नावावर केल्या. अर्शदीपने 4 षटकात 37 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. तसेच, सिराजने 4 षटकात 17 धावा देत 4 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. तसेच, हर्षल पटेल याने 1 विकेट घेतली. (Rain-affected third T20I between New Zealand and India has ended in a tied)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जो विक्रम आतापर्यंत कधीही बनला नाही, तो अर्शदीप अन् सिराज जोडगोळीने रचला; एकदा वाचाच
भले-भले आले, पण ‘ही’ कामगिरी फक्त भारतालाच जमली, अर्शदीप-सिराजच्या जबरदस्त गोलंदाजीमुळे केलं साध्य