---Advertisement---

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पावसाचा धोका? क्रिकेटप्रेमी जाणून घ्या हवामानाचा अंदाज

On: शनिवार, मार्च 8, 2025 6:04 PM
---Advertisement---

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 9 मार्च रोजी इंग्लंड विरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळणार आहे. न्यूझीलंड संघाच नेतृत्व कर्णधार मिचेल सेंटनरकडे आहे. अंतिम सामना दुबईच्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या अंतिम सामन्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.

भारतीय संघ न्यूझीलंडकडून 25 वर्षांपूर्वीचा बदला घेण्याच्या तयारीने मैदानात उतरेल. 2000 सालामध्ये दोन्ही संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पोहोचले होते. त्या सामन्यात न्युझीलँडने भारतीय संघाला पराभूत करून पहिला चॅम्पियन्स ट्रॉफीचा किताब उचलला होता. यानंतर पहिल्यांदाच दोन्ही संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात आमने-सामने असणार आहेत. आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिप मधील सामना न्यूझीलंडने भारतीय संघाला अंतिम सामन्यात हरवून जिंकला होता. रोहित शर्मा आणि संपूर्ण भारतीय संघ उद्या न्युझीलंडकडून बदला घेण्याच्या विचारात असेल.

भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील सर्व सामने जिंकले आहेत. भारतीय संघाने पहिल्या सामन्यात बांगलादेश, दुसऱ्या सामन्यात पाकिस्तान आणि तिसऱ्या साखळी सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केला. यानंतर उपांत्य फेरीत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला. भारतीय संघाने सर्वसामान्य दुबईच्या मैदानात खेळले आणि आता अंतिम सामना सुद्धा दुबईमध्येच खेळणार आहेत.

न्यूझीलंड संघाबद्दल बोलायचे झाल्यास त्यांनीही चांगलं क्रिकेट खेळल आहे. फक्त साखळी सामन्यात त्यांना भारताविरुद्ध पराभव पत्करावा लागला. न्युझीलंडने उपांत्य फेरी सामन्यात साऊथ आफ्रिका समोर 362 धावांच आव्हान ठेवलं होतं. तसेच न्यूझीलंड संघाने हा सामना जिंकला त्यामुळे त्यांच्याकडे बराच आत्मविश्वास आला असेल. स्पर्धेतील एक सामना न्यूझीलंड संघांनीही दुबईच्या मैदानावर खेळला आहे. त्यामुळे हे ग्राउंड त्यांच्यासाठी नवीन नसणार आहे.

रविवार 9 मार्च रोजी दुबईमध्ये भारत आणि न्यूझीलंड संघात अंतिम सामना दुपारी 2.30 वाजता सुरू होईल. 2 वाजता नाणेफेक होईल, यावेळेस तापमान 30 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. ढगाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे. पावसाची 10 टक्के शक्यता आहे. 20 ते 25 किलोमीटर प्रति तास वेगाने हवेतील वारे वाहण्याची शक्यता आहे.

दुबईमध्ये ढगाळी वातावरणासह थोड्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. पण पावसामुळे सामना रद्द होईल अशी कोणतीही शक्यता नाही.

हेही वाचा

रवींद्र जडेजा समोर विराट-रोहितही फेल, अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

IND vs NZ Final: फायनलपूर्वी भारताला मोठा झटका! दिग्गज विराट कोहलीला झाली दुखापत

भारत-न्यूझीलंड सामन्यात विराट कोहली करू शकतो रेकॉर्ड ब्रेकिंग खेळी!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---