चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा आता शेवटच्या पडावात आली आहे. भारतीय संघ आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये अंतिम सामना रविवारी 9 मार्च रोजी दुबईच्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. संपूर्ण जगाचे लक्ष या सामन्याकडे लागले आहे. 9 मार्च रोजी भारत आणि न्यूझीलंड पहिल्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीचा फायनल सामना खेळत नाही आहेत. याआधीही 2000 सालामध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेत न्युझीलंडने भारतीय संघाला पराभूत करून विजय मिळवला होता. आता जाणून घेऊया की दुबईची खेळपट्टी गोलंदाजांना की फलंदाजांना साथ देईल.
दुबईची खेळपट्टी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच फलंदाजांना अडचणीत टाकत आली आहे. संपूर्ण स्पर्धेत सर्वोत्तम स्कोर भारतीय संघानेच केला आहे. ज्यामध्ये उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारतीय संघाने 265 धावांचं आव्हान पूर्ण केलं. भारत-न्यूझीलंड अंतिम सामन्यात सुद्धा प्रत्येक वेळेप्रमाणे नवा चेंडू वेगाने टाकताना प्रभावी ठरू शकतो. आतापर्यंत पाहिले आहे की, 10-15 षटकानंतर दुबईमध्ये फिरकीपटू वेगाने गोलंदाजी करतात. खेळपट्टीचा अंदाज बघता नाणेफेक जिंकणारा संघ पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
आत्तापर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील चार सामने दुबईच्या मैदानावर खेळण्यात आले आहेत. विशेष स्वरूपात भारतीय संघासाठी वरूण चक्रवर्ती खूप घातक गोलंदाज ठरला आहे. तसेच मोहम्मद शमीला सुद्धा दुबईच्या खेळपट्टीने खूप सहाय्य केले आहे. तसेच एकूणच पहायचं झाल्यास अंतिम सामन्यात खेळपट्टी गोलंदाजांना मदत करू शकते.
हेही वाचा
IPL 2025; हैदराबादला मोठा धक्का, घातक गोलंदाज संपूर्ण स्पर्धेतून बाहेर; आफ्रिकन खेळाडूची निवड
SA vs NZ: दक्षिण आफ्रिकेचे स्वप्न भंगले, टेम्बा बावुमाने पराभवाबाबत केला मोठा खुलासा






